शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दीपक साळुंखे यांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी घेणार निर्णय ! 'आॅडिओ क्लिप'प्रकरणी पक्षाकडून नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:09 IST

मोतीराम चव्हाण यांचा शोध पोलिसांनी घ्यावा; दीपक आबांची मागणी.

ठळक मुद्देपक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल,' असे खासदार सुप्रिया सुळेअद्याप तरी माझ्यापर्यत नोटीस पोहोचली नाही - दीपक साळुंखेमला बदनाम करणाºयांचे पितळ उघडे पाडेन - दीपक साळुंखे

सोलापूर  : अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षांबद्दल  अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना पक्षाने नोटीस जारी केली आहे. 'याप्रकरणी साळुंखे यांच्याकडून स्पष्टीकरण आल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल,' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.  

दरम्यान, दिपक आबा 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, 'अद्याप तरी माझ्यापर्यत नोटीस पोहोचली नाही. ती मिळाल्यानंतर मी माझी बाजू सक्षमपणे मांडेन. मला बदनाम करणाºयांचे पितळ उघडे पाडेन. 

'ज्याच्या मोबाईलमधून ही आॅडिओ क्लिप व्हायरल झाली, तो मोतीराम चव्हाण कुठे आहे? हे विचारले असता दिपक आबा उसळून म्हणाले, 'ज्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन माज्यावर टीका केली, त्यांनाच विचारा. त्यांनीच कुठेतरी त्याला नेऊन ठेवले असेल. मोतीरामचा शोध आता पोलिसांनीच घ्यावा. वेळ पडली तर या प्रकरणाची सीआयडी चौकशीही व्हायला हवी.'

पुण्यात काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

 महिला पदाधिकाºयाबद्दल अश्लील भाषा वापरल्याचे आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांना पक्षाने नोटीस पटवून स्पष्टीकरण मागवल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. महिला अत्याचाराच्या संदर्भात 'मी टू' मोहीम सोशल मीडियावर जोर झरत असताना राजकीय पक्षांचेही बुरखे फाटताना दिसत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश होण्याची शक्यता आहे.    याबाबत अधिक माहिती अशी की, साळुंखे यांच्या नावाने एक आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात अक्कलकोट भागातील पदाधिकाºयांच्या निवडीविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला, त्यावर बोलताना अत्यंत हिणकस भाषा वापरली गेली आहे. त्यात शरद पवार, स्थानिक नेते आणि महिला पदाधिकाºयांचा उल्लेख करत आपली मते मांडली आहेत. या क्लिपमुळे सोलापूरसह राष्ट्रवादीच्या गोटातही खळबळ उडाली आहे. मात्र आजपर्यंत पक्षातर्फे त्यावर काहीही प्रतिक्रिया देण्यात येत नव्हती. 

सुळे यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी 'या विषयावर मी स्वत: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत बोलले आहे. त्यांचे स्पष्टीकरण आल्यावर निर्णय घेतला जाईल' अशी माहिती दिली. या विषयावर अधिक काहीही बोलण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पावित्र्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारण