आदी मोबदला मिळेल, मगच जमिनी संपादित हाेतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:35+5:302021-09-02T04:47:35+5:30

मोडनिंब : सीना-माढा सिंचन योजनेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे. उर्वरित भागाला पाणी मिळावे, यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ...

Adi will be paid, then the lands will be acquired | आदी मोबदला मिळेल, मगच जमिनी संपादित हाेतील

आदी मोबदला मिळेल, मगच जमिनी संपादित हाेतील

मोडनिंब : सीना-माढा सिंचन योजनेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे. उर्वरित भागाला पाणी मिळावे, यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कॅनॉल खोदाईमध्ये जाणार आहेत. त्यांना अगोदर मोबदला दिला जाईल. मात्र, त्यांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास या भागातील शेती पूर्णपणे ओलिताखाली येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सीना माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी जाधववाडी, बैरागवाडी शिवारात पोहोचताच, आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभापती विक्रमसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजीतसिंह शिंदे, भारत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.निशिगंधा माळी, पंचायत समिती सदस्य सपना पाटोळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी, रमेश पाटील, अधीक्षक अभियंता धीरज साळे, नारायण अलाट, गौरव देवकर, आर.पी. मोरे, शिरीष करडे, मोडनिंबच्या सरपंच मीनाताई शिंदे, जाधववाडीच्या सरपंच जयश्री महाडीक, बैरागवाडीच्या सरपंच जयश्री सुर्वे, युवती शहराध्यक्षा ऋतुजा सुर्वे, मोहनराव मोरे, नागनाथ पाटील, दिलीप भोसले आदी उपस्थित होते.

.............

फोटो : २९ मोडनिंबफोटो

सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी बैरागवाडी शिवारात पोहाेचल्यानंतर पूजन करताना, आमदार बबनराव शिंदे, विक्रमसिंह शिंदे, रणजीतसिंह शिंदे, भारत शिंदे, कैलास तोडकरी.

Web Title: Adi will be paid, then the lands will be acquired