शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

स्वअध्ययनाची जोड; देगाव येथील झेडपी शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 14:39 IST

मुलांचा प्रतिसाद : जे आॅनलाईन शिकविले, त्याची भिंतवाचनाने होते उजळणी

ठळक मुद्देभिंतीवरील ही माहिती विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर घालणारी ठरलीस्पर्धा परीक्षा तयारी करणाºया काही विद्यार्थ्यांच्या ज्ञानातही भर घातला सर्वसामान्य व्यक्ती दोन मिनिटे थांबून शाळेच्या भिंती न्याहाळतो

सोलापूर : शेतमजुरी आणि दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाºया देगाव येथील जिल्हा परिषद (मुले) शाळेच्या भिंती आता शैक्षणिक उपक्रमांनी बोलक्या झाल्या आहेत़ सकाळी मोबाईलवर आॅनलाईन धडे गिरवून दुपारी काही मुले शाळेच्या आवारात भिंतीवरील उपक्रमांचा आधार घेत स्वअध्ययनाची जोड दिली आहे.

 देगाव येथे शेतकरी आणि कष्टकरी मुलांसाठी १८९२ साली शाळा सुरू झाली़ आज या शाळेला १२८ वर्षे पूर्ण झाली.  मुख्याध्यापिका शाबेरा काझी यांनी मुलांच्या अभ्यासक्रमाने भिंती रंगवण्यासाठी काही प्रमाणात शासनाचा निधी मिळवला; मात्र तो कमी पडला़ त्यांनी अर्धे पैसे स्वत:कडचे खर्ची करून अध्ययनात्मक उपक्रमाने भिंती रंगवल्या. ज्ञानरचनात्मक क्लुप्त्यांवर भर दिला आहे.

भिंतीवरील ही माहिती विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर घालणारी ठरली. इतकेच नव्हे तर स्पर्धा परीक्षा तयारी करणाºया काही विद्यार्थ्यांच्या ज्ञानातही या भिंतींनी भर घातला. सर्वसामान्य व्यक्ती येथून जात असेल तर तो दोन मिनिटे थांबून शाळेच्या भिंती न्याहाळतो. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शिक्षक मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज अभ्यासक्रमाची आखणी करतात. सकाळी हे शिक्षक मोबाईलवर आॅनलाईन विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासक्रम समजावून सांगतात़ सध्या वर्ग बंद असले तरी काही विद्यार्थी सकाळी आॅनलाईन धडे गिरवून दुपारी या भिंती समोर थांबून उजळणी करतात़ 

असा आहे रंगविलेला अभ्यास !

  • - या भिंतीवर वर्षातले तीन ऋतू, सनावळ्या, विविध देशांची माहिती, पर्यावरण, विज्ञान प्रयोग आणि संगणक घटकाची माहिती रेखाटली आहे.
  • - समाजातील बारा बलुतेदारी आणि त्यांच्या व्यवसायावर आधारित माहिती साकारली आहे.
  • - रेल्वे, पोस्ट, सरकारी दवाखाने आणि इतर शासकीय कार्यालयांवर आधारित माहिती रंगवली आहे़
  • - या ई-लर्निंग शाळेत बोलक्या भिंतीची भर पडल्याने विद्यार्थ्यांना अध्ययन कृती सोपी झाली आहे.

३५ वर्षांच्या सेवेत विद्यार्थ्यांची चांगली फळी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सेवानिवृत्तीच्या टप्प्यात शाळेची सुधारणा व्हावी हीच इच्छा होती. विद्यार्थी आणि शाळा याचे आपण काहीतरी देणे लागतो. या शाळेच्या भिंती रंगवताना पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठराव्यात म्हणून वेगळा प्रयत्न केला.- शाबेरा काझीमुख्याध्यापिका, देगाव (मुले) झेडपी शाळा

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाonlineऑनलाइनcorona virusकोरोना वायरस बातम्या