मिलट्री कपड्याचे काम देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, आडम मास्तर यांची PM मोदी यांच्याकडे मागणी
By दिपक दुपारगुडे | Updated: January 19, 2024 13:16 IST2024-01-19T13:14:12+5:302024-01-19T13:16:12+5:30
या कार्यक्रमात रेनगर प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापुरातील यंत्रमागधारकांना मिलट्रीच्या कपड्याचे काम देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची विनंती पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे केली.

मिलट्री कपड्याचे काम देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, आडम मास्तर यांची PM मोदी यांच्याकडे मागणी
सोलापूर : गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडत असून प्रतिनिधिक स्वरूपात पाच महिला लाभार्थ्यांना घर देणार आहेत. ३५० एकर परिसर, ८३४ इमारती, ३० हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जानेवारी 2019 रोजी या प्रकल्पाचा शिलान्यास केला होता. जवळपास पाच वर्षानी पुन्हा नरेंद्र मोदी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी सोलापुरात आले आहेत.
या कार्यक्रमात रेनगर प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापुरातील यंत्रमागधारकांना मिलट्रीच्या कपड्याचे काम देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची विनंती पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे केली. शिवाय विडी कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन सुरू करावी, नवीन घरासाठी दोन लाखाची सबसिडी द्यावी, सोलर प्रकल्प द्यावेत, तसेच, आपण घर नाही बांगला दिला असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले.