शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सोलापुरात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:53 IST

सोलापूर : पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा विक्री करणाºया विक्रेत्यांवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. मांजाचे साहित्य जप्त ...

ठळक मुद्देबंदी असतानाही शहरात ठिकठिकाणी नायलॉन मांजा विक्रीसिद्धेश्वर पेठेतील इंडियन पतंग दुकानावर छापा टाकून २ हजार ८00 रूपये किमतीचा नायलॉन मांजा जप्तनायलॉनचा मांजा घातक असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे

सोलापूर : पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा विक्री करणाºया विक्रेत्यांवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. मांजाचे साहित्य जप्त करण्यात     आले असून, तिघांविरूद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

मोहम्मद रसूल सय्यद (वय ६५, रा. १0९, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर), सरफराज अ. कादीर देवणी (वय ३५, रा. २२, लोकमान्यनगर, आक्सा मशीद नई जिंदगी, सोलापूर), छाया गणपत साबळे (वय ५८, रा. ५0५, दक्षिण कसबा चौपाड जवळ, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. नायलॉनचा मांजा घातक असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

बंदी असतानाही हा मांजा बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. नायलॉन मांजाने पतंग उडवत असताना तो झाडावर व लाईटच्या खांबात अडकतो. अडकलेला मांजा हा पक्ष्यांच्या पायात सापडून जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. मांजा रस्त्यावरून जाणाºया दुचाकी वाहन चालकांनाही धोकादायक ठरत आहे. अनेकांचे गळे कापल्याच्या घटना शहरात घडले आहेत. मांजाचा धोका वाढत विक्रीवर १९७३ च्या कलम १४४ नुसार विक्री व साठवणूक करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

बंदी असतानाही शहरात ठिकठिकाणी नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे आढळून येत होते. याबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेऊन शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भीमसेन जाधव व त्यांच्या पथकातील कर्मचाºयांनी २६ जानेवारी रोजी ठिकठिकाणी छापे घातले. सिद्धेश्वर पेठेतील इंडियन पतंग दुकानावर छापा टाकून २ हजार ८00 रूपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला.

लोकमान्यनगर, नई जिंदगी येथील हनिफ पतंग मार्ट येथे २ हजार ७00 तर दक्षिण कसबा, चौपाड येथील आकाश स्नॅक्स दुकानातून १ हजार १00 रूपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम ५ सह भा.दं.वि.क. १८८, २९0, २९१ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास फौजदार लिगाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल थोरात, पोलीस नाईक बर्डे करीत आहेत. 

बाजारात नायलॉन मांजाची चलती...- डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीदरम्यान या पतंगाच्या सिझनमध्ये पतंग उडवण्याचा मोह लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असतो. कोण कोणाला कापणार या स्पर्धेसाठी मजबूत मांजाची मागणी बाजारात होत असते. पूर्वी सुती दोºयाला काचेची पावडर लावून मांजा तयार केला जात होता. आता नायलॉन मांजाने पतंग उडवतात. नायलॉन मांजाला मेटलकोटेड सुद्धा लावले जाते. मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी वाहनचालकांच्या गळ्याला लागून दु:खापत होत आहे. पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी मांजामुळे लोकांना प्राण गमवावा लागला आहे. 

शहरात जीवघेणा नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याची माहिती मिळाल्याने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही कारवाई आणखी तीव्र करणार आहोत.   पतंग उडविणाºया मुलांनी नायलॉनचा दोरा न वापरता साधा दोरा वापरावा.  यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल.- भीमसेन जाधव पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी