शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

केगांव बु, येथील दोन भावंडांचा अपघाती मृत्यू; पुण्यातून सोलापूरकडे येताना झाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 10:53 IST

पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत बंधूंच्या मृत्यूने कुटुंबासह परिसरात शोककळा

सोलापूरअक्कलकोट तालुक्यातील केगांव बु या गावात शेतकऱ्यांचे मोटार रिवाडींग करणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज देसाई आणि शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल देसाई यांचा काल रात्री पुण्यात अपघाती मृत्यू झाला.सोलापूर जिल्हा हा रोजगारांचा वणवा असलेला जिल्हा. या जिल्ह्यातील अनेक मुलं हाताला काम मिळाव या हेतूने आपल्या आई वडिलांना,आपल्या गावाला सोडून   कामासाठी पुण्याला जातात. त्यातलीच हे दोन तरुण, 27 वयाचा पंकज देसाई आणि अवघ्या 25 वयाचा राहुल देसाई....

महाराष्ट्रात कोरोना वाढत असल्याने  शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन पडल्याने पुण्यात काम करणाऱ्या या मुलांना कंपनीने सुट्या दिल्या. कंपनी बंद,मेस बंद मग या मुलांनी करावं काय ? पर्याय एकचं लॉकडाऊन हटेपर्यंत आपल्या गावाकडे जावं. याचं पर्यायाचा विचार करून काल पंकज देसाई आणि राहुल देसाई हे तरुण कंपनीच्या कामावरून आल्यावर गावाकडं निघाली. आपल्या गावाकडे आई-वडिलांच्या कुशीत विसावण्यासाठी येणाऱ्या या दोन मुलांवर रात्री काळाने घाला घातला आणि ती कायमची आई वडिलांची कुशी सोडून देवाच्या कुशीत विसावली.पंकज देसाई हा इरप्पा देसाईंचा मोठा मुलगा, मुलाच लग्न करावं म्हणून मोठ्या हौसेनी वडिलांनी गावात घर बांधले. दिवाळीत मुलाचं हात पिवळ करण्याचा आतच पंकज वडिलांना सोडून गेला,किती हे दुर्दैव ?. यापेक्षा मोठी दुर्दैव म्हणजे सिद्धाराम देसाई यांचा,एकुलता एक मुलगा,यापूर्वीच पत्नीला देवाज्ञा आली होती.

ज्याच्याकडे बघून आशेने जगावं तर तोच बापाचा हात अर्ध्यावर सोडून जगाचा निरोप घेतला..! किती हे महाभयंकर दुर्दैव. देव एवढा कठोर होऊ शकतो का..?केगांव मधील तरुणामध्ये नेहमी मिसळणाऱ्या पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत भावंडांच्या मृत्यूने अख्य गावं शोक सागरात बुडाली आहे.सर्व तरुण बैचेन झाली आहेत.पुण्यावरून निघताना घरच्यांशी आणि  गावातील काहीं मित्रांशी या मुलांनी गावाकडे येत असल्याबद्दल रात्री फोन वरून संभाषण साधली होती.रात्री चांगल्या बोललेल्या मित्राची  बातमी काही तासात अशी येईल असे वाटले नव्हते. लहान वयात अर्ध्यावर डाव  मोडल्याने या हृदयद्रावक घटनेने मित्रमंडळीसह कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

 पंकज देसाई याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ,एक बहीण असा परिवार आहे,तर राहुल देसाई याच्या पश्चात फक्त त्याचा दुर्दैवी बाप आणि दोन बहिणी आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातPuneपुणेakkalkot-acअक्कलकोट