घराकडे येताना नांदणीजवळ अपघात, लिमयेवाडीतील तरुणाचा मृत्यू
By शीतलकुमार कांबळे | Updated: October 8, 2023 18:58 IST2023-10-08T18:58:18+5:302023-10-08T18:58:38+5:30
शकील कय्युम शेख (वय ३५, रा. लिमयेवाडी, सोलापूर) असे अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे.

घराकडे येताना नांदणीजवळ अपघात, लिमयेवाडीतील तरुणाचा मृत्यू
सोलापूर : घराकडे येत असताना सोलापूर-विजयपूर रस्त्यावरील नांदणी (ता.द. सोलापूर) जवळ अपघात झाला. या अपघातात लिमयेवाडीतील एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार ८ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली. शकील कय्युम शेख (वय ३५, रा. लिमयेवाडी, सोलापूर) असे अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शकील शेख हे रात्री उशिरा नांदणी येथून लिमयेवाडी येथील राहत्या घरी दुचाकीवरून डबलसीट येत असताना नांदणी येथील पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत शकील याच्या डोक्यास व दोन्ही पायांस मोठी जखम झालेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला मिळून आला. त्यास १०३३ या रुग्णवाहिकेतून मित्र विक्रम प्रेमचंद आहेर याने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दोन वाजता दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉ. दिनेश देवराज यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच लिमयेवाडीतील शेख कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली.