पंढरपुरात अपघात; एसटी बसखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

By Appasaheb.patil | Updated: January 25, 2023 17:31 IST2023-01-25T17:30:32+5:302023-01-25T17:31:05+5:30

पंढरपूर शहरासोबतच तालुक्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Accident in Pandharpur A woman died on the spot after accident under an ST bus | पंढरपुरात अपघात; एसटी बसखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

पंढरपुरात अपघात; एसटी बसखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

सोलापूर : पंढरपूर शहरातील सरगम चौकात एसटी बसखाली चिरडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. पंढरपूर शहरासोबतच तालुक्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र दिसून येत आहे. 

दरम्यान, पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, एमएच १४ बीटी ११९० क्रमांकांची अकलूज-पंढरपूर ही एसटी बस पंढरपूर बसस्थानकाकडे येत होती. याच दरम्यान, सरगम चौकात एसटी बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला.  जयाबाई थिटे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलrस दलाचे पोलीस आधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठविले. घटनेनंतर या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच थिटे कुटुंबियांनी पंढरपूर रूग्णालयात धाव घेतली. या अपघाताची नोंद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात होत आहे.

Web Title: Accident in Pandharpur A woman died on the spot after accident under an ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.