भाविकाच्या जीपला अपघात

By Admin | Updated: August 17, 2014 23:37 IST2014-08-17T23:37:12+5:302014-08-17T23:37:12+5:30

एस.टी.- जीपची धडक; बालक ठार, १४ जण जखमी

Accident of the devotee jeep | भाविकाच्या जीपला अपघात

भाविकाच्या जीपला अपघात


पंढरपूर : पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला येणाऱ्या तावशी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील भाविकांच्या जीपला एस.टी.ने धडक दिल्याने जीपमधील एका बालकाचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले आहेत. ही घटना भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली.
तावशी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथून वीरेंद्र नारायण व्हरकटे (वय ३५), जयश्री मिलिंद व्हरकटे (वय ४५), मैना भीमराव सांगडे (वय ४७), अनिता प्रसन्नकुमार व्हरकटे (वय ३०), सुनीता संजय व्हरकटे (वय ४६), मेघराज प्रसन्नकुमार व्हरकटे (वय ७), क्षितीजा प्रसन्नकुमार व्हरकटे (वय १३), बायडाबाई नारायण व्हरकटे (वय ६०), जयश्री सुनील साबळे (वय ३६), विश्वराज वीरेंद्र व्हरकटे (वय साडेसहा वर्षे), रुद्रा राहुल व्हरकटे (वय ३), नंदा फत्तेसिंह धुमाळ (वय ४५), ऋतुजा प्रसन्नकुमार व्हरकटे (वय १२, सर्व रा. तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे) या सर्वांना (क्र. एम. एच. ४२/के. ६९१४) जीपमध्ये विशाल शंकरराव घुले (वय ३०, रा. पानधर, ता. बारामती, जि. पुणे) हे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी घेऊन जीप मधून निघाले होते.
दरम्यान ते भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे आले असता पंढरपूरकडून स्वारगेटकडे निघालेल्या एस.टी.ला (क्र. एम. एच. १४/बी. टी. ३०७२) धडक झाली.
या अपघातात मेघराज प्रसन्नकुमार व्हरकटे या बालकाचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले. जखमींना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत वीरेंद्र व्हरकटे यांनी तालुका पोलीस ठाण्यात बसचालक सूर्यकांत मधुकर गुरव (रा. मरवडे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तपास स.पो.नि. धोत्रे करीत आहेत.

Web Title: Accident of the devotee jeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.