सोलापूर विद्यापीठाचा बजेट सुरू असताना एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 14, 2023 16:57 IST2023-03-14T16:56:59+5:302023-03-14T16:57:29+5:30

सभागृह बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. या वेळी विद्यार्थी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला.

ABVP students raise slogans during budget opening of Solapur University | सोलापूर विद्यापीठाचा बजेट सुरू असताना एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी

सोलापूर विद्यापीठाचा बजेट सुरू असताना एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वार्षिक अंदाजपत्रक मंगळवारी दुपारी सादर झाला. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात बजेट सुरू असताना सभागृह बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बजेटचाही यावेळी निषेधही नोंदवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून झाला.

सभागृह बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. या वेळी विद्यार्थी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विद्यार्थ्यांना बाहेरच रोखले. या वेळी पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी गेट बाहेर नेले. त्यानंतर आंदोलन शांत झाले.

Web Title: ABVP students raise slogans during budget opening of Solapur University