फेरफरार अदालतीत बळीराजाला जागेवर मिळणार दुरुस्त सातबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:22 IST2021-02-10T04:22:38+5:302021-02-10T04:22:38+5:30
मोडनिंब : माढा तालुक्यातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोंदी जागेवरच रीतसर करून देण्यासंदर्भात विशेष फेरफार अदालत आयाेजित करण्यात आले ...

फेरफरार अदालतीत बळीराजाला जागेवर मिळणार दुरुस्त सातबारा
मोडनिंब :
माढा तालुक्यातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोंदी जागेवरच रीतसर करून देण्यासंदर्भात विशेष फेरफार अदालत आयाेजित करण्यात आले आहे. १० फेब्रुवारी रोजी मोडनिंब येथील शिव पार्वती मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता फेरफार अदालत होत असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यासह संबंधित महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या विशेष फेरफार अदालत मोहिमेचा जिल्ह्यातील प्रारंभ माढा तालुक्यातून होत आहे.
या कार्यक्रमास माढा तालुक्यासह मोहोळ आणि करमाळा येथील शेतकरी व नागरिकांना ७/१२ उताराचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये माढा तहसील कार्यालयातील ३१ जानेवारी २०२१ पर्यंत ११५० नोंदी ह्या प्रलंबित आहेत. त्यात खरेदी विक्री व्यवहार, बक्षीस पत्र, गहाण खत, हक्कसोडपत्र,वारस नोंदी, पोटहुकूमनामे सर्व प्रकारांचा समावेश आहे