रामजन्मभूमी मंदिरासाठी अभिजित पाटील यांनी दिली लाखाची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:22 IST2021-01-23T04:22:22+5:302021-01-23T04:22:22+5:30

सध्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तीन वर्षाच्या कार्यकाळात हे मंदिर बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. ...

Abhijit Patil donates Rs 1 lakh for Ram Janmabhoomi temple | रामजन्मभूमी मंदिरासाठी अभिजित पाटील यांनी दिली लाखाची देणगी

रामजन्मभूमी मंदिरासाठी अभिजित पाटील यांनी दिली लाखाची देणगी

सध्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तीन वर्षाच्या कार्यकाळात हे मंदिर बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. मंदिराच्या अतिभव्य बांधकामासाठी मोठा निधी गोळा करण्याचे काम श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट माध्यमातून निधी समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. या ऐतिहासिक कार्यात आपणही खारीचा वाटा उचलून पावन व्हावे, तसेच पंढरपूरचा एक सामान्य नागरिक म्हणून सर्व पंढरपूरवासीयांच्यावतीने माझा भाव श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी या अभियानात सहभागी होत आहे, अशी भावना धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, राजेश दंडे, काशिनाथ थिटे, राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (वा. प्र.)

फोटो ::::::::::::::::::::::

अयोध्या येथे प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर बांधण्यासाठी १ लाख रुपयांचा धनादेश देताना धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील.

Web Title: Abhijit Patil donates Rs 1 lakh for Ram Janmabhoomi temple