शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी पैशावरून एकाचे अपहरण; तिघाविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 10:25 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा/लोकमत न्युज नेटवर्क

सध्या साखर कारखाने सुरू झाले असून ऊसतोडणी उचलीवरून वादाचे प्रकार सूरु झाले आहेत.  हाजापूर ( ता.& मंगळवेढा)  येथे ऊसतोडणी उचल वरून वादंग झाले आहे यामध्ये  एका महिलेच्या पतीला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून अपहरण केल्याची तक्रार मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान या प्रकरणी तानाजी मारूती पांढरे (रा. पांढरेवाडी ता. जत जि सांगली ) व अन्य अज्ञात दोघे या तिघाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

यातील फिर्यादी वैशाली दिनकर देवकते (वय २७ वर्षे रा. हाजापूर) ही अपहरणकर्त्याची पत्नी असून दि. २० रोजी फिर्यादी व तिचा पती दिनकर देवकते (वय ३४ वर्षे) व मुलगी (वय ९ वर्षे) असे सर्वजण  घरासमोर बसले असताना ओळखीचे आरोपी तानाजी मारूती पांढरे व त्यांच्या सोबत अन्य अज्ञात दोघे असे तिघेजण मिळून त्यांचे बुलेट गाडीवर घरी आले. त्या तिघा आरोपीनी फिर्यादीचे पती यांच्यामध्ये कोणतातरी व्यवहारावरून वाद सुरू झाला होता. फिर्यादीने या वादाबाबत पतीकडून माहिती घेतली असता ऊसटोळी कामगार चांगले आहेत का ? याबाबत त्यांना उचल स्वरूपात पैसे दिले होते. पैसे घेवूनही कामगार कामावर गेले नाहीत या कारणास्तव फिर्यादीच्या पतीला आरोपी जबाबदार धरू लागले असल्याचे पतीने पत्नीस सांगितले.

दरम्यान तदनंतर फिर्यादीच्या पतीला आरोपीने बळजबरीने बुलेटवर घेवून गेले. फिर्यादीने पतीशी अनेकवेळा मोबाईलवरून संपर्क केला मात्र आरोपीने संपर्क होवू दिला नाही. काही कालावधीनंतर फोन बंद लागत असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेCrime Newsगुन्हेगारी