वीटभट्टीवर आईसोबत गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण
By विलास जळकोटकर | Updated: February 15, 2024 17:50 IST2024-02-15T17:49:43+5:302024-02-15T17:50:16+5:30
सोलापूर : आईसोबत वीटभट्टीवर कामाला गेलेल्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं फूस लावून अपहरण करण्याची घटना सोलापुरातील एका परिसरात घडल्याचे ...

वीटभट्टीवर आईसोबत गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण
सोलापूर : आईसोबत वीटभट्टीवर कामाला गेलेल्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं फूस लावून अपहरण करण्याची घटना सोलापुरातील एका परिसरात घडल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी मुलीच्या आईनं विजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानं बुधवारी रात्री उशिरात भा. दं. वि. ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदला आहे. यातील फिर्यादी ही वीटभट्टीतसेच अन्य मोलमजुरीची कामे करुन आपल्या कुटुंबाची गुजराण करते.
१५ वर्षाची मुलगी आहे. बुधवारी ती आईसमवेत कामाला गेलेली होती. दुपारी ४ च्या दरम्यान ती कामाच्या ठिकाणी दिसली नाही. आजूबाजूला, नातलगांकडे चौकशी कनही ती मिळून आली नाही. अखेर पिडित मुलीच्या आईने वीटभट्टीवरुन तिला कोणीतरही फूस लावून पळवून नेले असा आरोप पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदला असून, तपास फौजदार पाटील करीत आहेत.