पंढरपुरातून अल्पवयीन मुलाचं अपहरण<bha>;</bha> मातेची पोलीस ठाण्यात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST2020-12-30T04:30:15+5:302020-12-30T04:30:15+5:30
राणी चव्हाण या आई, पती व ११ वर्षांचा मुलगा रवि यांच्यासोबत ज्ञानेश्वरनगर येथे एकत्र राहतात. त्या मोलमजुरी करून आपल्या ...

पंढरपुरातून अल्पवयीन मुलाचं अपहरण<bha>;</bha> मातेची पोलीस ठाण्यात धाव
राणी चव्हाण या आई, पती व ११ वर्षांचा मुलगा रवि यांच्यासोबत ज्ञानेश्वरनगर येथे एकत्र राहतात. त्या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे पती सर्कसमध्ये काम करत असून, सध्या ते तामिळनाडू येथे आहेत.
दरम्यान, २५ डिसेंबर रोजी मुलगा रवी हा गल्लीत इतर मुलांसोबत खेळत होता. संध्याकाळी साडेनऊपर्यंत तो घरी आलाच नाही. त्यामुळे राणी चव्हाण यांनी गल्लीमध्ये आपल्या मुलाचा शोध घेतला. मात्र तो कुठेही दिसला नाही. त्यानंतर त्यांनी त्याचेसोबत रोज खेळण्याऱ्या मुलांकडे विचारणा केली. मात्र रात्रीपर्यंत तो एकटाच तेथे खेळत असल्याची माहिती इतर मुलांनी दिली. त्यामुळे मुलाच्या आईने अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले असल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.