अबब..आगीचे लोळ पाहून 'एमआयडीसी'त धडकी भरली!
By रवींद्र देशमुख | Updated: April 18, 2023 13:42 IST2023-04-18T13:42:48+5:302023-04-18T13:42:59+5:30
गादी कारखाना जळाला: दहा लाखांचे नुकसान

अबब..आगीचे लोळ पाहून 'एमआयडीसी'त धडकी भरली!
रवींद्र देशमुख/सोलापूर: अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील समाधान नगरातील एका गादी कारखान्याला मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. या घटनेत आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मंगळवारी अचानक कारखान्याला मोठी आगीने घेरले. या आगीचे लोळ मोठया प्रमाणात पसरल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आग लागल्याची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पाच गाडया घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असून अंदाजे ८ ते १० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत इतर दोन कारखान्यांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील काही महिन्यांपासून अक्कलकोट एमआयडीसी परिसरात आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.