शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

अबब... सोलापूरचा कोरोना मृत्यूदर १०.०९ टक्के; ४६ दिवसांत ६३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:17 IST

राज्यात सर्वाधिक :  पहिल्या क्रमांकावरील जळगावचा ११.५३ टक्के तर अमरावती तिसºया स्थानी

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना नेमका आला कसा ? हे कोडे प्रशासनाला अद्याप उलगडले नाहीआजारी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर येते, असा गंमतीशीर पण तितकाच गंभीर प्रकार सोलापुरात सोलापुरात मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून, ४६ दिवसांत ५९ मृत्यू कोरोनाने झाले आहेत

महेश कुलकर्णी 

सोलापूर : कोरोनाने महाराष्टÑातील सर्वच भागात हातपाय पसरलेले आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाचा प्रसार होत असला तरी मृत्यूदर हा साधारण २ ते ३ टक्क्यांपर्यंत असेल, असे जगभरातील तज्ज्ञ सांगत असले तरी महाराष्टÑातील जळगाव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांचा मृत्यूदर अनुक्रमे ११.५३% आणि १०.०९% झालेला आहे.

जळगाव हा महाराष्टÑातील सर्वाधिक मृत्यूदर असलेला जिल्हा ठरला आहे तर दुसºया क्रमांकावर सोलापूर आहे. याखालोखाल तिसरा क्रमांक अमरावतीचा आहे. अमरावती जिल्ह्यात मृत्यूदर ७.६९% इतका आहे. 

महाराष्टÑात मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती ही शहरे रेड झोनमध्ये आहेत. या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे अधिक मृत्यू झाले आहेत तर सोलापूर शहरात हे प्रमाण अधिक आहे.

मृत्यूदर वाढण्याची चार प्रमुख कारणे...

  • - कोरोनाची लक्षणे अनेक दिवस दिसल्यावरही तपासणी न करणे.
  • - खासगी रुग्णालयात न मिळणारे उपचार
  • - अपुरी वैद्यकीय सेवा. 
  • - केवळ सरकारी सेवेवर अवलंबून असणे आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव.
  • - फिजिकल डिस्टन्स न पाळणे

जळगावमध्ये ५६ दिवसांत ५४; सोलापुरात ४६ दिवसांत ६३ मृत्यू- जळगावमध्ये कोरोनाच्या ५६ दिवसांत कोरोनाचे ५४ मृत्यू झाले आहेत, तर सोलापुरात १२ एप्रिल रोजी पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. तोही रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे मृत्यूनंतरच कळले! सोलापुरात मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून, ४६ दिवसांत ५९ मृत्यू कोरोनाने झाले आहेत.

देशाचा २.९८% तर राज्याचा मृत्यूदर ३.२१%- देशात कोरोनाचा मत्यूदर हा २.९८% इतका आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ महाराष्टÑात होत आहे. सध्या दर दिवशी तीन हजारांच्या आसपास नवे पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात आढळत आहेत. राज्याचा मृत्यूदर ३.२१% एवढा आहे.

सोलापुरात मृत्यूनंतरच कळतो कोरोना !- सोलापुरात कोरोनाच्या रुग्णांचा सतत वाढता आलेख आहे. एवढे होऊनही सोलापुरात कोरोना नेमका आला कसा ? हे कोडे प्रशासनाला अद्याप उलगडले नाही. एखाद्या आजारी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर येते, असा गंमतीशीर पण तितकाच गंभीर प्रकार सोलापुरात सातत्याने दिसतो आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव