शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

आषाढी सोहळा;  टाळमृदंगाने भूवैकुंठ पंढरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:51 PM

चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे !  ही एकमेव आस मनी धरुन पंढरपुरात दाखल झालेल्या लाखो वैष्णवांनी चंद्रभागेच्या तीरी स्नानासाठी गर्दी केली होती. 

ठळक मुद्दे‘‘उठा पांडुरंगा, प्रभात समयो पातला ! वैष्णवांचा मेळा गरुडापरी दाटला!’’एकादशीदिनी सकाळी  विविध संतांच्या पालख्या मार्गावरुन नगरप्रदक्षिणेलासंतांच्या पालख्या मठात तर दिंड्या चंद्रभागातीरी ६५ एकरामध्ये  विसावल्या

पंढरपूर : ‘‘उठा पांडुरंगा, प्रभात समयो पातला ! वैष्णवांचा मेळा गरुडापरी दाटला!’’ पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी  गेले काही दिवस पायी वाटचाल करणाºया विविध संतसज्जनांच्या पालख्यांसह  भक्तीगंगा चंद्रभागातीरी दाखल झाल्या असून पंढरपुरात पाऊल ठेवल्याने त्यांना अवघा आनंद झाल्याचे चित्र गुरूवारी पहायला मिळाले. संतांच्या पालख्या मठात तर दिंड्या चंद्रभागातीरी ६५ एकरामध्ये  विसावल्या. सुमारे १० लाखाची मांदियाळी पंढरपुरात दाखल झाली आहे.

वाखरी पालखी तळावरून  सर्व पालखी सोहळे दुपारनंतर पंढरीच्या दिशने निघाले. कॉलेज चौक, सरगम चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक, भादुले चौकमार्गे प्रदक्षिणा मार्गावरून आपापल्या मठाच्या या पालख्या गेल्या.  प्रदक्षिणा मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज,संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक् ताबाई  यांचे मठ आहेत़  या पालखी सोहळ्यासोबत आलेल्या दिंड्यातील वारकºयांची सोय प्रशासनाने नदीपलीकडील ६५ एकर परिसरात केली आहे़ पंढरपुरात प्रमुख महाराजांच्या नावाने सुमारे ३०० पेक्षा जास्त मठांची संख्या आहे़ त्या मठात उर्वरित वारकरी मुक्कामी असतात़ एकटे दुकटे आलेल्या वारकºयांनी  चंद्रभागेत पवित्र स्नान करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहणे पसंत केले. 

दर्शनासाठी २७ तास...श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन पश्चिमद्वारातून बाहेर आलेल्या रंजना घाणे (साकोरमांडवा, ता़ संगमनेर, जि़ नगर) म्हणाल्या, बुधवारी दुपारी १़३० वाजता दर्शन रांगेत उभी राहिले.गुरुवारी दुपारी ४़३० वाजता दर्शन घेऊन बाहेर आले़ दर्शनासाठी तब्बल २७ तास लागले़ नांदेडचे सुभाष शिंदे, किसन कदम, बालाजी घोगरे म्हणाले, आम्ही गुरुवारी पहाटे ५़३० वाजता गोपाळपूर येथे दर्शन रांगेत उभारलो़ दुपारी ४़४५ वाजता पांडुरंगाचे दर्शन घेऊन बाहेर आलो़ दर्शन रांगेत शाबूची खिचडी, चहा व पिण्याचे स्वच्छ पाणीही मिळाले़ 

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी