सोलापूर : चीप्पा मार्केट परिसरात यूवकाचा डोक्यात फरशी घालून खून
By रूपेश हेळवे | Updated: January 15, 2023 13:38 IST2023-01-15T13:38:28+5:302023-01-15T13:38:52+5:30
चिप्पा मार्केटमध्ये एका युवकाचा डोक्यात फरशी घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

सोलापूर : चीप्पा मार्केट परिसरात यूवकाचा डोक्यात फरशी घालून खून
सोलापूर : अशोक चौक परिसरातील चिप्पा मार्केटमध्ये एका युवकाचा डोक्यात फरशी घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारात उघडकीस आली. घटना कळतात जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अद्याप त्या युवकाचा ओळख पटली नसून अंदाजे ३५-४० वर्षाचा तरुण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.
भाजी विक्रेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या चिप्पा मार्केट परिसरात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. घटनास्थळी मयत तरुण हा निपचित पडला होता. त्याच्या अंगावर मोठा फरशीचा तुकडा त्याच्या जवळच पडला होता. रक्ताचा सडा पडला होता. दरम्यान, घटनेची माहिती करतात शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले.