मजा म्हणून यात्रेतील पाळण्यात बसला; खाली उतरल्यावर चक्कर येऊन पडला, रुग्णालयात दाखल
By शीतलकुमार कांबळे | Updated: January 17, 2024 18:39 IST2024-01-17T18:37:48+5:302024-01-17T18:39:02+5:30
डोक्याला लागला मार

मजा म्हणून यात्रेतील पाळण्यात बसला; खाली उतरल्यावर चक्कर येऊन पडला, रुग्णालयात दाखल
सोलापूर : शहराचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त भरलेल्या गड्डा यात्रेत पाळण्यात बसलेला तरुण खाली उतरताना चक्कर येऊन पडल्याने त्याच्या डोक्यास जखम झाली. पावणेएकच्या सुमारास ही घटना घडली. सोहेल आसिम अंगलगिरी (वय- २५, सलगर वस्ती, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.
यात्रेनिमित्त जखमी सोहेल हा होम मैदानावर भरलेल्या गड्डा यात्रेत आला होता. मनोरंजनासाठी तो पाळण्यात बसला होता. काही वेळानं पाळणा थांबल्यानंतर तो खाली उतरताना त्याला चक्कर आल्यानं खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लालागला. तातडीने त्याचा मित्र मौलाली हल्ल्याळ याने शुद्ध हरपलेल्या अवस्थेत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरु केले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.