चालकाचा ताबा सुटल्यानं पुलावरुन ट्रक खाली पडल्यानं तरुण जखमी
By शीतलकुमार कांबळे | Updated: December 9, 2023 18:43 IST2023-12-09T18:42:51+5:302023-12-09T18:43:00+5:30
सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक हा अक्कलकोटहून सोलापूरकडे येत होता.

चालकाचा ताबा सुटल्यानं पुलावरुन ट्रक खाली पडल्यानं तरुण जखमी
सोलापूर : सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक (बल्कर) चालकाचा ताबा सुटल्याने पुलावरुन रोडच्या बाजूला कोसळल्यानं ३५ वर्षाचा तरुण जखमी झाला. अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळजवळ ही घटना घडली. तरुणाची ओळख अद्याप पटली नाही. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
यातील सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक हा अक्कलकोटहून सोलापूरकडे येत होता. कर्जाळ गावाजवळील पुलावरुन ट्रक पास होत असताना अचानक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रोडच्या खाली कोसळला. या वाहनातून सदर तरुण प्रवास करीत होता.
अपघाताचे वृत्त कळताच वळसंग टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात येऊन जखमीला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्याला डोक्यास व पायाला गंभीर जखम झाली. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीूत या घटनेची नोंद झाली आहे.