रस्त्याच्या वादातून तरुणाला तिघांनी सळई, दगडाने केली मारहाण; सोलापूरमधील घटना
By रवींद्र देशमुख | Updated: June 19, 2023 17:05 IST2023-06-19T17:05:25+5:302023-06-19T17:05:39+5:30
रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सावडी (ता. करमाळा) येथील शिवारात ही घटना घडली.

रस्त्याच्या वादातून तरुणाला तिघांनी सळई, दगडाने केली मारहाण; सोलापूरमधील घटना
सोलापूर : शेतातील वहिवाट रस्त्याच्या वादावरून तिघांनी मिळून तरुण शेतकऱ्याला लोखंडी सळई, दगडानं बेदम मारहाण करून जखमी केले. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सावडी (ता. करमाळा) येथील शिवारात ही घटना घडली. गणेश महादेव राऊत (वय- ३० रा. सावडी, ता. करमाळा) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
यातील जखमीला नारायण तळेकर, तुकाराम तळेकर यांच्यासह तिघांनी मिळून लोंखंडी सळई आणि दगडानं मारहाण केली. यामुळे त्याच्या सर्वांगास मुका मार लागला. त्याच्यावरत करमाळा येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.