तेरा वर्षीय मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा
By रूपेश हेळवे | Updated: April 19, 2023 18:34 IST2023-04-19T18:34:17+5:302023-04-19T18:34:29+5:30
सोलापूर : तेरा वर्षीय मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणावर बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. वैभव ...

तेरा वर्षीय मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा
सोलापूर : तेरा वर्षीय मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणावर बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. वैभव आप्पासाहेब बागळे (वय २०, रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे.
पीडित मुलगी ही शाळेला व इतर क्लासला जात असताना आरोपी बागळे हा वारंवार तिचा पाठलाग करत होता. शिवाय तो सतत दुचाकीवरून पीडितेच्या घर परिसरात चकरा मारत होता, अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या आईने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.