शेतात लटकलेली वायर बांधताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

By दिपक दुपारगुडे | Updated: July 12, 2023 16:28 IST2023-07-12T16:28:05+5:302023-07-12T16:28:33+5:30

बुधवारी दुपारी १ च्या सुमारास सावळेश्वर येथील भारत लांडगे यांच्या शेतात लटकत असलेली इलेक्ट्रिकची वायर ओढून बांधताना अचानक शॉक लागून राहुल सातपुते हे बेशुद्ध झाले.

A young man died of shock while tying a hanging wire in the field | शेतात लटकलेली वायर बांधताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

शेतात लटकलेली वायर बांधताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

सोलापूर : शेतात तुटलेली वायर ओढून बांधताना शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. राहुल अभिमान सातपूते ( वय २६, रा. नान्नज, उत्तर सोलापूर ) असे शॉक लागलेल्या तरुणाचे नाव आहे.

बुधवारी दुपारी १ च्या सुमारास सावळेश्वर येथील भारत लांडगे यांच्या शेतात लटकत असलेली इलेक्ट्रिकची वायर ओढून बांधताना अचानक शॉक लागून राहुल सातपुते हे बेशुद्ध झाले. त्यांना लगेच उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत राहुल सातपुते यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.

राहुल सातपुते यांचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. घरची जबाबदारी त्याच्यावरच होती. या घटनेची माहिती कळताच नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

Web Title: A young man died of shock while tying a hanging wire in the field