सोलापूरमध्ये घरी एकटी असलेल्या महिलेला घरात शिरुन तिघांकडून अत्याचार
By विलास जळकोटकर | Updated: May 8, 2023 16:38 IST2023-05-08T16:37:48+5:302023-05-08T16:38:45+5:30
पीडित महिलेवर सोमवारी पहाटे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरु आहेत.

सोलापूरमध्ये घरी एकटी असलेल्या महिलेला घरात शिरुन तिघांकडून अत्याचार
सोलापूर : घरामध्ये एकट्या असलेल्या महिलेच्या घरात शिरुन तिला लाथाबुक्क्यानी मारहाण करुन तिघांकडून अत्याचार करण्याची घटना बार्शी तालुक्यातील एका गावात रविवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास घडली. पीडित महिलेवर सोमवारी पहाटे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरु आहेत.
यातील पीडित ३० वर्षीय विवाहित महिला घरामध्ये एकटीच असल्याचे पाहून तिघेजण आत शिरले. महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिने जिवाचा आकांत करत असताना बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आणि संशयित आरोपी पळून गेले. घरातील मंडळी आल्यानंतर पिडितेने संबंधीत प्रकार सांगितला. यानंतर तिला वैराग येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन सोमवारी पहाटेच्या दरम्यान महिलेची जाऊने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असून, प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद आहे.