शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

थांबा नसताना एक्सप्रेस थांबवून प्रसुतीवेदना होणाऱ्या महिलेला रुग्णालयात पोहोचवले; तिने गोडस मुलीला दिला जन्म

By appasaheb.patil | Updated: December 28, 2022 16:39 IST

तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या माणुसकीच्या दर्शनाने सर्वच भारावले. 

सोलापूर : पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत थांबा नसलेली राजकोट एक्सप्रेस कुर्डूवाडी स्थानकावर थांबविली. यानंतर एका महिलेला सुखरूपपणे डब्यातून उतरावले अणि वेळेत रूग्णालयात पोहोचवले. यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या माणुसकीच्या दर्शनाने सर्वच भारावले. 

सविस्तर वृत्त असे की, २७ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ८.४८ वाजता कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यास माहिती मिळाली. गाडी नंबर २२७०८ राजकोट एक्सप्रेस कोच नंबर एस ५, सीट नंबर १० नंबरवरील महिला प्रवासी यांना प्रसुती वेदना होत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस हवालदार एम.टी.माने, हवालदार प्रकाश जिराळ व पोलिस नाईक विकास भोसले यांनी स्टेशनवर जावून गाडीला थांबा नसताना ती थांबविण्यास भाग पाडले. तात्काळ त्या महिलेला गाडीतून खाली उतरावून ग्रामीण रूग्णालय, कुर्डूवाडी येथे दाखल केले. २७ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी त्या महिलेले गोंडस मुलीला जन्म दिला. 

ही ही उत्कृष्ट कामगिरी कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एम.टी.माने, पोलिस हवालदार प्रकाश जिराळ व पोलिस नाईक विकास भोसले यांनी पार पाडली.

१५ मिनिटे एक्सप्रेस थांबली... -राजकोट एक्सप्रेसला कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा नाही. ती थेट सोलापूर रेल्वे स्थानकावरच थांबते. मात्र प्रसंगावधान राखत लोहमार्ग पोलिसांनी संबंधित रेल्वे यंत्रणेला कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर गाडी थांबविण्यास भाग पाडले. त्या महिलेच्या उपचारासाठी एक्सप्रेस १५ मिनिटे स्थानकावरच थांबली होती. त्यानंतर ती पुन्हा धावत पुढे गेली.

हैद्राबादच्या महिलेची कुर्डूवाडीत प्रसुती... -रेल्वे प्रवासात असताना त्रास होत असल्याने मुळची हैद्राबाद येथील रहिवासी असलेली रंजनीदेवी मंहातो ही महिला कुर्डूवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुत झाली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्यासोबत प्रवास करताना तिचे पती सुनिलकुमार मंहातो हे उपस्थित होते. लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे सर्वांनी लोहमार्ग पोलिसांचे अभिनंदन करून कौतुक केले. 

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेWomenमहिलाhospitalहॉस्पिटल