ट्रॅक्टरमध्ये खेळता खेळता पडल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
By Appasaheb.patil | Updated: November 26, 2023 17:07 IST2023-11-26T17:07:04+5:302023-11-26T17:07:35+5:30
मंगळवेढा तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

ट्रॅक्टरमध्ये खेळता खेळता पडल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
विलास मासाळ, मंगळवेढा : दोन वर्षाचा चिमुकला ट्रॅक्टरमध्ये खेळता खेळता खाली पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथे आज घडली आहे.
देवराज आलकराया पुजारी (वय २ वर्षे, रा हुन्नूर, ता.मंगळवेढा) असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन वर्षाचा चिमुकला रोजच्या प्रमाणे ट्रॅक्टरमध्ये खेळत असताना अचानक तोल गेल्यानं तो खाली पडला त्याच्या डोक्यावर जोराचा मार लागला होता. त्यास उपचारासाठी हुन्नूर येथील डॉक्टरांना दाखवण्यात आले त्यांनी बाळाला पुढे घेऊन जाण्यास सांगितले. जत येथील एका रुग्णालयात बाळाला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली.
देवराज हा सर्वांचा लाडका होता, अत्यंत हुशार अशा देवराजच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.