शरद पवारांबद्दल अपशब्द वापरल्याने सदाभाऊ खोतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

By Appasaheb.patil | Updated: July 10, 2023 18:52 IST2023-07-10T18:52:15+5:302023-07-10T18:52:53+5:30

सदाभाऊ खोत यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

A symbolic effigy of Sadabhau Khota was burnt for using abusive language against Sharad Pawar | शरद पवारांबद्दल अपशब्द वापरल्याने सदाभाऊ खोतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

शरद पवारांबद्दल अपशब्द वापरल्याने सदाभाऊ खोतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्याबद्दल खालच्या स्तरावर वक्तव्य करणाऱ्या भाजपचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस व युवक संघटनेच्या वतीने निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. याचवेळी खोतांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मार करून जाळून त्याच्या निषेधार्थ खोतांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला युवक प्रदेश सचिव हर्षल प्रधाने, सेवादल शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, जिल्हा उपाध्यक्ष महेश माने, नजीब शेख, मुसा अत्तार, सर्फराज शेख, गफुर शेख, संपन्न दिवाकर, अजमल शेख, शेरू लोकपल्ली, सागर भोसले, फारुक मटके, मिलिंद गोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

Web Title: A symbolic effigy of Sadabhau Khota was burnt for using abusive language against Sharad Pawar