शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या पोराने अंगावर हात उचलला; मुख्याध्यापक बापाची जगण्याची इच्छाच संपली, उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:15 IST

सौरभ याने मागील काही वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटकमध्ये मोठी रक्कम देऊन प्रवेश घेतला होता.

Solapur Suicide Case : "मला जॉब नाही, त्यामुळे काहीतरी उद्योगधंदा उभारून द्या," असे म्हणून एका हायस्कूलला मुख्याध्यापक असलेल्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केल्याने व मुलाच्या वारंवारच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली आहे. ही घटना माढा तालुक्यातील लऊळ इथं घडली असून संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत बाळासाहेब पितांबर पाटील हे मयत झाले असून याबाबत निखिल पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा सौरभ बाळासाहेब पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सापटणे भोसे येथे राहत्या घरी फिर्यादीचा भाऊ सौरभ पाटील याने मला काही जॉब नाही, मला उद्योगधंदा करून द्या म्हणून वडिलांना शिवीगाळ करून भांडण करत मारहाणही केली. त्याच्या नेहमीच्या शिवीगाळ, मारहाणीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी लऊळ शिवारात ढोरे वस्तीजवळील रेल्वेला समोर गेले. यामुळे ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास सौरभ याने प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीवर बी. एन. एस कलम १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सौरभ पाटील याला पोलिसांनी अटक केली असून माढा न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी सारिका गटकूळ या करीत आहेत.

मुलाचे वैद्यकीय शिक्षणही अपूर्ण...आरोपी मुलगा सौरभ याने मागील काही वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटकमध्ये मोठी रक्कम देऊन प्रवेश घेतला होता. परंतु तेथूनही हा मुलगा अर्धवट शिक्षण सोडून घरी परत आलेला होता. त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद व भांडणे होत होती, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी