विहीरीचे खोदकाम करताना उंचावरून दगड डोक्यात घडून मजुराचा मृत्यू
By रूपेश हेळवे | Updated: April 30, 2023 18:10 IST2023-04-30T18:09:49+5:302023-04-30T18:10:04+5:30
मृत सुभाष राठोड शनिवारी सकाळी जेऊर शिवारातील गौराबाई सुतार यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम करीत होते. त्यावेळी ५० ते ५५ फुटावरून विहिरीवरील मोठा दगड त्यांच्या डोक्यावर पडला.

विहीरीचे खोदकाम करताना उंचावरून दगड डोक्यात घडून मजुराचा मृत्यू
सोलापूर : विहिरीचे खोदकाम करत असताना ५० ते ५५ फुटावरून मोठा दगड डोक्यात पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी शिवारात घडली. सुभाष सोमलिंग राठोड ( वय ४१, रा. जेऊर गोपाळ तांडा, ता अक्कलकोट ) असे त्या मयत मजुराचे नाव आहे.
मृत सुभाष राठोड शनिवारी सकाळी जेऊर शिवारातील गौराबाई सुतार यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम करीत होते. त्यावेळी ५० ते ५५ फुटावरून विहिरीवरील मोठा दगड त्यांच्या डोक्यावर पडला. त्यामुळे दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात रविवारी सकाळी दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.