शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयद्रावक घटना; दोन भावंडांसह तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 22:18 IST

करकंब येथील दुर्दैवी घटना : गावावर शोककळा पसरली

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : पंढरपूर तालुक्यात करकंब येथील मोडनिंब रोडलगत परदेशी यांच्या शेतातील तळ्यामध्ये पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतामध्ये सख्ख्या भावंडांचा मृत्यू आहे. ही घटना शनिवारी, १३ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. मनोज अंकूश पवार (वय ११), गणेश नितीन मुरकुंडे (वय ७), हर्षवर्धन नितीन मुरकुंडे (वय ९) अशी मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी करकंब शहरालगत मोडनिंब रोडवर परदेशी यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या टँकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना गावात वा-यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

या तलावातून मनोज अंकुश पवार, गणेश नितीन मुरकुंडे, संस्कार नितीन मुरकुंडे ही तीन शाळकरी मुले पडल्याची माहिती पोलिसांना दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आणि रात्री ८ वाजता मृतदेह हाती लागले. त्यांना बाहेर काढताच त्यांच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. तिघांचे मृतदेह रात्री शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ही मुले सायंकाळी उशीरापर्यंत घरी न परतल्याने पालकांनी शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र ही मुले शेततळ्यात पडली कशी आणि नेमकी किती वाजता पाण्यात पडली हे काेणालाही सांगता येत नव्हते. या दुर्दैवी घटनेने करकंबवर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून नोंदीचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर