दहावीत शिक्षणाऱ्या मुलीला रस्त्यावर अडवून मारहाण; पीडितेच्या मामीची तक्रार, विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा
By विलास जळकोटकर | Updated: January 30, 2024 18:59 IST2024-01-30T18:59:37+5:302024-01-30T18:59:43+5:30
पीडितेच्या मामीचे तक्रार केल्याने बसप्पा रंगप्पा शेंडगे याच्याविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे.

दहावीत शिक्षणाऱ्या मुलीला रस्त्यावर अडवून मारहाण; पीडितेच्या मामीची तक्रार, विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा
सोलापूर: दहावीमध्ये शिक्षणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन रस्त्यावर अडवले आण तिला दोरीने डोळ्यावर, चेहऱ्यावर, पाठीवर मारहाण करुन जखमी करण्याची धक्कादायक घटना शहरातील एका परिसरात घडली. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात पीडितेच्या मामीचे तक्रार केल्याने बसप्पा रंगप्पा शेंडगे याच्याविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे. यातील फिर्यादीत म्हटले आहे की, पिडिता ही तिचे वडील मयत झाल्याने तिच्या मामा-मामीकडे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील एका परिसरात राहतात. ती दहावीला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून एक मुलगा तिचा पाठलाग करीत असल्याचे तिने मामीला सांगितले होते. मात्र त्याचे नाव पत्ता नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
रविवारी शाळेत दहावीचे सराव पेपर असल्याने ती शाळेला निघाली होती. सकाळी ७:४५ च्या दरम्यान, वरील आरोपीने तिची सायकल अडवून दोरीने तिला मारहाण सुरु केली. यात तिच्या डोळ्यावर, चेहऱ्यावर व पाठीला गंभीर दुखापत झाली. या प्रकाराची पिडितेच्या मामीला फोनवरुन माहिती मिळाली. दरम्यान जखमी अवस्थेत पिडितीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार वरीलप्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. तपास फौजदार दाईंगडे करीत आहेत.