सोलापूर: अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या व सोलापूरच्या रस्त्यावर अनवाणी पायाने गल्लोगल्ली फिरणाऱ्या प्रा. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. त्या खासदार बनल्या. सोलापूर ते दिल्ली हा त्यांचा प्रवास अगदी थक्क करणार आहे.
शिंदेसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीला न्याय दिल्याचे बोलले जात आहे. वाघमारे यांची पार्श्वभूमी ही आंबेडकरी चळवळीतील असून त्यांचे वडिल हे नगरसेवक होते. त्यांची मातृभाषा तेलगू असली तरी त्यांनी इंग्रजीतून पीएचडी केली आहे, तर मराठी भाषेवर त्यांचे प्रभूत्व आहे. त्या सोलापुरातील महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला होता.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2024 ची लोकसभा 2024 ची विधानसभा निवडणूक प्रचाराची जबाबदारी ज्योती वाघमारे यांनी सांभाळली. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते पद सांभाळताना त्यांनी पक्षाची बाजू राज्यस्तरावर जोरदार लावून धरली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या कार्याची दखल घेत राज्यसभेची उमेदवारी बहाल केली आहे.
ज्योती वाघमारे यांच्या रुपाने सोलापुरातील तिसऱ्या नेत्याला राज्यसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांनी राज्यसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून काम केले आहे.
Web Summary : Jyoti Waghmare, from a humble Solapur family, secured a Rajya Sabha seat. Eknath Shinde nominated her, recognizing her work as a Shiv Sena spokesperson. Her background is in the Ambedkar movement. She follows Sushilkumar Shinde and Ranjitsinh Mohite Patil as Solapur representatives in the Rajya Sabha.
Web Summary : सोलापुर की गरीब पृष्ठभूमि से आईं ज्योति वाघमारे को राज्यसभा में सीट मिली। एकनाथ शिंदे ने शिवसेना प्रवक्ता के रूप में उनके काम को पहचानते हुए उन्हें नामांकित किया। उनकी पृष्ठभूमि आंबेडकर आंदोलन में है। वह सुशीलकुमार शिंदे और रणजितसिंह मोहिते पाटिल के बाद राज्यसभा में सोलापुर का प्रतिनिधित्व करेंगी।