शांतीनगरातील कारखान्याला लागली आग; १० कोटी नुकसानीचा अंदाज

By Appasaheb.patil | Updated: March 5, 2023 19:25 IST2023-03-05T19:25:18+5:302023-03-05T19:25:18+5:30

नई जिंदगी परिसरातील शांती नगरातील एका कारखान्याला मोठी आग लागली.

A fire broke out at a factory in Shantinagar; 10 crore loss estimate | शांतीनगरातील कारखान्याला लागली आग; १० कोटी नुकसानीचा अंदाज

शांतीनगरातील कारखान्याला लागली आग; १० कोटी नुकसानीचा अंदाज

सोलापूर :

नई जिंदगी परिसरातील शांती नगरातील एका कारखान्याला मोठी आग लागली. या आगीत अंदाजे १० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. वेळेवर सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविता आल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी सांगितले.

शांतीनगरात विश्व इंडस्टीज नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात डाईन सेक्शन विभागाला मोठी आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले. या आगीची माहिती अग्निशामक दलाला २.२० वाजता माहिती मिळाली, त्यानंतर दलाच्या पाच घटनास्थळावर पोहोचल्या. आग भडकत असतानाच पाण्याचा मारा मोठया प्रमाणात केल्याने आग विझविण्यात यश मिळाले. कारखान्यात कच्चा व पक्का माल मोठया प्रमाणात होता. युनिट नंबर १ ला आग लागली असून युनिट २ चे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. आगीची घटना कळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनीही घटनास्थळाला भेट दिली.

Web Title: A fire broke out at a factory in Shantinagar; 10 crore loss estimate