उसने पैसे मागितल्याने वस्त्र्याने वार, मैत्री दिनाच्या पूर्व संध्येला मित्रावर गुन्हा दाखल

By दिपक दुपारगुडे | Updated: August 6, 2023 15:51 IST2023-08-06T15:51:10+5:302023-08-06T15:51:22+5:30

मित्राला दिलेले उसने पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण केल्याने मित्रावर मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला गुन्हा दाखल झाला आहे.

A case was filed against a friend on the eve of Friendship Day, when he stabbed her with a cloth for asking for money | उसने पैसे मागितल्याने वस्त्र्याने वार, मैत्री दिनाच्या पूर्व संध्येला मित्रावर गुन्हा दाखल

उसने पैसे मागितल्याने वस्त्र्याने वार, मैत्री दिनाच्या पूर्व संध्येला मित्रावर गुन्हा दाखल

सोलापूर : मित्राला दिलेले उसने पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण केल्याने मित्रावर मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अभिजीत मारूती गुंजले ( वय ४२, रा. शिवगंगा नगर ४, कुमठा नाका) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी श्रीनिवास भिमनपल्ली (रा. इंदिरा नगर, कुमठा नाका) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी अभिजित यांनी त्यांचे मित्र आरोपी श्रीनिवास यांना १० हजार रुपये उसने दिले होते. या पैशासाठी त्यांनी मागणी केल्यानंतर चिडून जाऊन श्रीनिवास याने फिर्यादीला शिवीगाळ करत, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय खिशातील दाढी करण्याच्या वस्त्र्याने त्यांच्या हनवटीवर मारून जखमी केले. या प्रकरणी श्रीनिवास भिमनपल्ली याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास नदाफ करत आहेत.

Web Title: A case was filed against a friend on the eve of Friendship Day, when he stabbed her with a cloth for asking for money