पोलिसाला शिवीगाळ अन् मारहाणीचा गुन्हा दाखल! आणखी एकावरही कारवाई
By रवींद्र देशमुख | Updated: September 30, 2023 18:29 IST2023-09-30T18:29:13+5:302023-09-30T18:29:23+5:30
रवींद्र देशमुख / सोलापूर: पैशांच्या व्यवहारातून शिवीगाळ, मारहाण करून धमकी दिल्यावरून पोलिसासह दोघांविरुद्ध शनिवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला ...

पोलिसाला शिवीगाळ अन् मारहाणीचा गुन्हा दाखल! आणखी एकावरही कारवाई
रवींद्र देशमुख / सोलापूर: पैशांच्या व्यवहारातून शिवीगाळ, मारहाण करून धमकी दिल्यावरून पोलिसासह दोघांविरुद्ध शनिवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास हिरामोती टॉवरसमोर ही घटना घडल्याची तक्रार जगन्नाथ सुदर्शन आडम यांनी दिली आहे. यातील फिर्यादी जगन्नाथ आडम व पोलिस राजकुमार वाघमारे, महेंद्र राजू गोगरे (रा. गोंधळे वस्ती, सोलापूर) यांच्यामध्ये शुक्रवारी हिरामोती टॉवरसमोर दुपारी अडीचच्या सुमारास पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला. यात राजकुमार वाघमारे व महेंद्र गोरे यांनी फिर्यादीला शिवीगाळ, मारहाण करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.