खेळताना तोल गेल्यानं दहा फूट स्लॅबवरुन चिमुकला कोसळला
By रवींद्र देशमुख | Updated: April 16, 2024 19:52 IST2024-04-16T19:52:22+5:302024-04-16T19:52:50+5:30
अचानक त्याचा तोल गेल्यानं तो दहा फूट स्लॅबवरुन कोसळला.

खेळताना तोल गेल्यानं दहा फूट स्लॅबवरुन चिमुकला कोसळला
सोलापूर : दहा फूट उंचीच्या स्लॅबवर खेळता खेळता तोल गेल्यानं चार वर्षाच्या चिमुकला खाली कोसळून जखमी होण्याची घटना शहरातील लष्कर परिसरात मंगळवारी दहाच्या सुमारास घडली. दुर्गेश धाकसिंग कजागवाले (वय- ४, रा. लोधी गल्ली, लष्कर, सोलापूर) असे या चिमुकल्याचे नाव आहे. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. यातील चिमुकला दुर्गेश सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरी स्लॅबवर खेळत होता. घरातील अन्य मंडळी सकाळची वेळ असल्याने आपापल्या कामात व्यस्त होते. अचानक त्याचा तोल गेल्यानं तो दहा फूट स्लॅबवरुन कोसळला. एकच गोंधळ उडाला.
आजूबाजच्यांनी धावाधाव केली. तातडीने त्याचे वडील धाकसिंग यांनी जवळच असलेल्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.