पाण्याची मोटार बंद करताना शॉक लागून १० वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत

By रवींद्र देशमुख | Updated: May 9, 2023 12:41 IST2023-05-09T12:40:16+5:302023-05-09T12:41:14+5:30

पाणी भरल्यानंतर मोटारीचे विद्युत कनेक्शन काढण्यासाठी शांतराज याला विजेचा जोरात धक्का बसला.

A 10-year-old boy died of shock while shutting off the water motor in Solapur | पाण्याची मोटार बंद करताना शॉक लागून १० वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत

पाण्याची मोटार बंद करताना शॉक लागून १० वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत

सोलापूर : पाण्याची मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या १० वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली.

शांतराज युवराज तल्लाेर ( वय १०, रा. इमानियार चौक, कुंभार गल्ली, लष्कर) असे त्या मुलाचे नाव आहे. नळाला पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे तल्लाेर कुटुंबिंयानी पाणी ओढण्यासाठी मोटार लावलेली होती. पाणी भरल्यानंतर मोटारीचे विद्युत कनेक्शन काढण्यासाठी शांतराज याला विजेचा जोरात धक्का बसला. ही घटना कळताच त्याला उपचारासाठी आई वडिलांनी व शेजाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना कळताच हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती.

Web Title: A 10-year-old boy died of shock while shutting off the water motor in Solapur