शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
5
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
6
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
9
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
10
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
11
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
12
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
13
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
14
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
15
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
16
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
17
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
18
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
19
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
20
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

एसटी महामंडळाच्या ९६ लालपरीने ६२७ प्रवाशांना घेऊन जिल्ह्याची वेस ओलांडली

By appasaheb.patil | Published: August 21, 2020 12:15 PM

प्रवासाला निघाले सोलापूरकर; लॉकडाऊननंतर प्रथमच लांबचा प्रवास  

ठळक मुद्देतब्बल १५१ दिवसांनंतर सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपºयात पुन्हा एकदा लालपरी प्रवाशांना घेऊन धावलीपहिल्या दिवशी सोलापूर आगारातून पुणे, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा, कराड, विजापूर, बीड, उमरगा या गाड्यांना प्रवाशांची किमान गर्दी होतीप्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढेल, असा विश्वास एस.टी.च्या सोलापूर विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी व्यक्त केला

सोलापूर : तब्बल १५१ दिवसांनंतर सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपºयात पुन्हा एकदा लालपरी प्रवाशांना घेऊन धावली़ पहिल्या दिवशी सोलापूर आगारातून पुणे, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा, कराड, विजापूर, बीड, उमरगा या गाड्यांना प्रवाशांची किमान गर्दी होती. आज दिवसभरात ९६ बस जिल्ह्याबाहेर धावल्या. प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढेल, असा विश्वास एस.टी.च्या सोलापूर विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी व्यक्त केला. प्रवासासाठी सॅनिटायझर आणि मास्क मात्र बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव  झाल्यानंतर मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात १५ मार्चपासून टप्प्याटप्प्याने तर २३ मार्चपासून एसटी बसच्या फेºया बंद करण्यात आल्या. जिल्हा, आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासी वाहतूक बंद झाली. दरम्यान, मे महिन्यात एसटीने परप्रांतीय मजूर, विद्यार्थी आदींना सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी आंतरराज्य सेवा दिली. २२ मेपासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू होती, बुधवारी शासनाने काढलेल्या आदेशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच आगारातून एसटी बस धावल्याची माहिती विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली़ सकाळी साडेपाच वाजता सोलापूर-बार्शी ही पहिली एसटी गाडी सुटली, त्यात एकही प्रवासी नव्हता, गाडीत फक्त चालक व वाहकच असल्याचे सांगण्यात आले़ गुरुवारी दिवसभर एसटी बसस्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हजेरी लावली.

वंचितने केला जल्लोष...सोलापूर ते स्वारगेट ही एमएच १३ सीयू ८३३९ एसटी बस सोलापूर स्थानकातून सुटणार होती़ यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्या हस्ते गाडीची विधिवत पूजा करण्यात आली़ यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी प्रवास करणाºया प्रवाशांना लाडू वाटून, फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला़ दरम्यान, प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले़ यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्या अंजना गायकवाड, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेश्मा मुल्ला, पल्लवी सुरवसे, सुजाता वाघमारे, नगरसेवक गणेश पुजारी, बबन शिंदे, श्रीमंत जाधव, नानासाहेब कदम, शिवाजी बनसोडे, हणमंतु पवार, विजय बमगोंडे, रवी थोरात, विनोद इंगळे, चंद्रकांत सोनवणे, देविदास चिंचोळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़ 

चौकशी केंद्रावर अधिक गर्दी...एसटी सुरू झाल्याची माहिती समजताच प्रवाशांनी सोलापूर बसस्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाविषयी माहिती घेण्यासाठी व कोणती गाडी कधी सुटणार आहे, कधी येणार आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी चौकशी केंद्रावर प्रवाशांनी गर्दी केली होती़ दिवसभर नियंत्रण कक्षातून कोणती गाडी कोणत्या फलाट क्रमांकावर लागली याबाबतच्या सूचना एसटी अधिकाºयांकडून स्पीकरवरून देण्यात येत होत्या़ 

चालक-वाहकानेच केली एसटीची स्वच्छताबºयाच दिवसांपासून बंद असलेल्या एसटी बस गुरुवारी बाहेर काढण्यात आल्या़ बसमध्ये बºयाच प्रमाणात कचरा साचला होता. शिवाय काचेवर व सीटवर धूळ साचली होती़ वाहक व चालकाने कोणाचीही मदत न घेता स्वत:हून एसटी बसची स्वच्छता करून घेतली़ कागदाच्या साह्याने काच साफ केली़

टॅग्स :SolapurसोलापूरBus Driverबसचालकcorona virusकोरोना वायरस बातम्याAnil Parabअनिल परब