शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

coronavirus; ११९ वर्षांचे सिव्हिल हॉस्पिटल करतंय कोरोनासाठी व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:23 AM

कोरोनाशी लढा: साथीच्या उपचारासाठी तयार केलेले हॉस्पीटल, डॉक्टरची टीम म्हणतेय हम है तयार...

ठळक मुद्देइंग्रजांनी साथीच्या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी १८९७ ला महामारी कायदा लागू केला११९ वर्षांच्या काळात या हॉस्पिटलमध्ये अनेक नामवंत डॉक्टरांनी रुग्णसेवा केली१९७२ च्या दुष्काळात पसरलेल्या साथीच्या आजारावर या ठिकाणच्या पथकाने रात्रंदिवस काम करून उपचार केले

राजकुमार सारोळे 

सोलापूर : इंग्रजांनी साथीच्या रोगाच्या बंदोबस्तासाठी ११९ वर्षांपूर्वी सोलापुरात तयार केलेले सिव्हिल हॉस्पिटल आजही कोरोना साथीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. 

इंग्रजांनी साथीच्या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी १८९७ ला महामारी कायदा लागू केला. त्यानंतर दहा वर्षांनी महाराष्ट्रात साथीच्या आजाराच्या बंदोबस्तासाठी पुण्यात ससून, मिरज आणि सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटलचे बांधकाम हाती घेतले. या तिन्ही हॉस्पिटलच्या इमारती दगडी असून, डिझाईन जवळपास एकसारखी आहे. 

सोलापुरात सध्या अस्तित्वात असलेले सिव्हिल हॉस्पिटल साथीच्या रोगासाठी असल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची लागण शहरातील नागरिकांना होऊ नये म्हणून हे त्याकाळी शहराबाहेर बांधण्यात आले होते. कालांतराने नागरी वस्ती वाढत जाऊन सिव्हिल हॉस्पिटल सध्या मध्यवर्ती वसल्याचे दिसून येते. 

इंग्रजांनी जुन्या बी ब्लॉकमध्ये साथरोग रुग्णालय सुरू केले. या इमारतीचा पायाभरणी समारंभ १२ डिसेंबर १९११ रोजी त्या काळच्या जिल्हाधिकाºयांच्या हस्ते झाला. त्यानंतर या रुग्णालयाचे उद्घाटन व्ही. जॉर्ज यांच्या हस्ते झाले. या रुग्णालयास किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल असे नाव देण्यात आले होते. पहिले सिव्हिल सर्जन म्हणून डॉर्करप यांनी काम पाहिले. हे रुग्णालय सामान्य लोकांच्या सेवेसाठी उपयुक्त ठरल्याने सिव्हिल हॉस्पिटल म्हणून नाव रूढ झाले. ११९ वर्षांच्या काळात या हॉस्पिटलमध्ये अनेक नामवंत डॉक्टरांनी रुग्णसेवा केली.

१९६२ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग वेगळा झाला. महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या देखरेखीखाली रुग्णालयाचा कारभार सुरू झाला. त्यानंतर वेगवेगळे विभाग निर्माण झाले. रुग्णसेवेसाठी ओपीडी, ए व सी ब्लॉकची निर्मिती झाली. त्यानंतर जुन्या बी ब्लॉकमध्ये अस्थी, नेत्र, स्त्रीरोग आणि डिलिव्हरी असे विभाग होते. नवीन बी ब्लॉकच्या निर्मितीनंतर हा ब्लॉक दहा वर्षे धूळखात पडून होता. नुकतेच सामाजिक संस्थेने या इमारतीचे नूतनीकरण करून इतिहास ताजा ठेवला आहे. त्याकाळी बी ब्लॉकला लागूनच साथरोगासाठी छोटी दगडी इमारत बांधलेली आहे. या इमारतीत आजही संसर्गजन्य आजाराचे रुग्ण ठेवले जातात. याठिकाणी स्वॉईन फ्लू, कॉलरा, टीबीच्या रुग्णांवर केले जातात. १९७२ च्या दुष्काळात पसरलेल्या साथीच्या आजारावर या ठिकाणच्या पथकाने रात्रंदिवस काम करून उपचार केले. त्याचबरोबर अलीकडच्या काळात उन्हाळा तीव्र होत आहे. 

कोरोनाचा खास कक्ष सुरू- कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खास कक्ष तयार करण्यात आला आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिसिन विभागाचे डॉ. विठ्ठल धडके, डॉ. राजेश चौगुले, डॉ. औदुंबर मस्के यांच्याबरोबर मेडिसिन, कम्युनिटी मेडिसिन, मायक्रो बायोलॉजी, सोशल मेडिसिन या विभागातील तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. कोरोनाला घाबरू नका, फक्त खबरदारी घ्या. लक्षणे आढळल्यास जवळच्या दवाखान्यात जा. प्राथमिक अवस्थेत हा आजार बरा होतो. संशयितांवर उपचारासाठी आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया डॉ. धडके यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य