सांगोला शहर व तालुक्यात आढळले ९० पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:23 IST2021-04-20T04:23:31+5:302021-04-20T04:23:31+5:30
सांगोला शहर १६, चिणके १, वाटंबरे १४, चोपडी २, जवळा १३, तरंगेवाडी १, मेडशिंगी ८, बुरलेवाडी १, ढाळेवाडी १, ...

सांगोला शहर व तालुक्यात आढळले ९० पॉझिटिव्ह रुग्ण
सांगोला शहर १६, चिणके १, वाटंबरे १४, चोपडी २, जवळा १३, तरंगेवाडी १, मेडशिंगी ८, बुरलेवाडी १, ढाळेवाडी १, हंगिरगे १, लक्ष्मीनगर १, कारंडेवाडी (बुद्धेहाळ) १, पवारवाडी (महूद) २, बामणी १, मांजरी २, मेटकरवाडी २, एखतपूर १, आलेगाव २, कडलास १, शिरभावी १, वाकी शिवणे १, लोणविरे १, देवकतेवाडी ३, अकोला १, घेरडी ३, संगेवाडी १, डोंगरगाव १, उदनवाडी १, असे ९० पॉझिटिव्ह रुग्ण सोमवारी आढळून आले आहेत.
सांगोला तालुक्यात सध्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ६०५ झाली असून, काही जणांवर कोविड सेंटरमध्ये तर काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या महिनाभरात १० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असला तरी नागरिकांसह प्रशासनालाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.