सोलापुरातील महाराष्टÑ बँकेला नऊ लाखांचा गंडा, वाहनासाठीचे कर्ज स्वत:साठी वापरले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 13:25 IST2017-11-22T13:18:24+5:302017-11-22T13:25:12+5:30
चार वाहन घेण्यासाठी बँकेकडे अर्ज करुन कर्जाची फाईल सादर केली. बँक व्यवस्थापकास हाताशी धरुन मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेतून वाहन न घेता स्वत:साठी वापरुन बँकेची फसवणूक केल्याबद्दल चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

सोलापुरातील महाराष्टÑ बँकेला नऊ लाखांचा गंडा, वाहनासाठीचे कर्ज स्वत:साठी वापरले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २२ : चार वाहन घेण्यासाठी बँकेकडे अर्ज करुन कर्जाची फाईल सादर केली. बँक व्यवस्थापकास हाताशी धरुन मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेतून वाहन न घेता स्वत:साठी वापरुन बँकेची फसवणूक केल्याबद्दल चौघांविरुद्ध आज (मंगळवारी) विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. हा प्रकार ३ जुलै ते आजतागायत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, बसवेश्वरनगर येथे राहणाºया राहुल संजय म्हेत्रे याने चारचाकी वाहनासाठी महाराष्टÑ बँकेच्या सिव्हिल शाखेकडे कर्जमागणीचा अर्ज सादर केला होता. यावेळी त्यांनी तत्कालीन बँक व्यवस्थापक अशोक एल. गायकवाड यांच्याशी संगनमत करुन ९ लाख ३४ हजार रुपये कर्ज मंजूर करुन घेतले. या प्रक्रियेत सोलापूर व्हिलिंग कंपनीचा मालक निलेश निवृत्ती झिंबल, मेहंदीअली इकराम सय्यद यांची मदत घेतली. बँक कर्जाचे प्रकरण सादर करताना राहुलने बँकेकडे वाहन खरेदी केल्याची कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. असे असतानाही तत्कालीन बँक व्यवस्थापक गायकवाड यांनी कोणत्याही प्रकारचा आक्षेप नोंदवला नाही.
मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेतून राहुलने वाहन न घेता संबंधित रक्कम परस्पर अन्य कामासाठी वापरली. बँकेकडून तपासणीच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. सध्या कार्यरत असलेले बँक व्यवस्थापक नागेश्वरराव रामुलू बाणूत (वय ३१, रा. अम्मपालम, जि. खम्मम, राज्य तेलंगणा सध्या प्लॉट नं. ३० , बी, नरसिंहनगर, जुळे सोलापूर) यांनी वरिष्ठांना या प्रकाराची कल्पना देऊन त्यांच्या सूचनेनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हे प्रकरण आर्थिक गुन्ह्याशी निगडित असल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन थिटे यांनी या प्रकरणाचा रिपोर्ट घेऊन हे प्रकरण फौजदारी प्रकरण गुन्हा कलम ४२०, ४१७ अन्वये गुन्हा नोंदविण्यासाठी विजापूर नाका पोलीस ठाण्याकडे पाठविले. अधिक तपास फौजदार राठोड करीत आहेत.
--------------------------
आणखी एक घोटाळा उघडकीस येणार ?
गेल्या वर्षभरात आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यात शेखर काडगावकर फायनान्स प्रकरण, जुनी मिल कंपाउंड जागा घोटाळा, पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि आता महाराष्टÑ बँकेला गंडा. पंजाब बँक फसवणुकीत वाहन कर्जासाठी रक्कम घेऊन परस्पर त्याचा वापर करणाºया गुन्ह्याची संख्या अधिक आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असतानाच महाराष्टÑ बँक फसवणुकीचा आणखी एक गुन्हा नोंदला आहे. या प्रकरणाचीही व्याप्ती अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकेकडे कर्जाचे प्रकरण सादर करण्यासाठी मध्यस्थ असलेल्या कंपन्यांची मंडळी बँकेचे जबाबदार अधिकारी आणि कर्जदार यांच्यामध्ये मध्यस्थी साधून असे गुन्हे करतात हे यापूर्वीच्या गुन्ह्यावरुन सिद्ध होत आहे. या प्रकरणातही असे रॅकेट आहे काय याचा पोलीस शोध घेत आहेत.