शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील मोहसीन शेखच्या न्यायासाठी ८० हजार लोकांनी केले Tweet

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:30 IST

मॉब लिचिंगचा बळी; सोशल मीडियावर ‘जस्टीस फॉर मोहसीन’ हा ट्रेंड

ठळक मुद्देफेसबुक आणि टिष्ट्वटर जस्टीस फॉर मोहसीन हा ट्रेंड चालवण्यात आलालंडन, अमेरिकेसह आपल्या देशातील विविध शहरांतून लोकांनी हा ट्रेंड चालवलायामध्ये सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, राजकीय नेत्यांचा समावेश होता

सोलापूर : पुण्यात पाच वर्षांपूर्वी मॉब लिचिंगचा बळी ठरलेल्या सोलापूरच्या मोहसीन शेखला न्याय मिळावा यासाठी सोशल मीडियावर ‘जस्टीस फॉर मोहसीन’ हा ट्रेंड चालवण्यात आला. जगभरातून एक लाख २० हजारांहून अधिक लोकांनी टिष्ट्वट, पोस्ट करुन न्यायाची मागणी केली.

मोहसीन शेख आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सोलापूर आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते गेल्या चार वर्षांपासून आंदोलन करीत आहेत. सोशल मीडियावरील ट्रेंडबाबत सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. मेहबूब कोथिंबीरे म्हणाले, मोहसीन हा सोलापूरच्या विकास नगरात राहायला होता. पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाºया या तरुणाची समाजकंटकांनी २ जून २०१४ रोजी खून केला होता. याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई याला अटक झाली. देसाईला जामिनावर सोडण्यात आले आहे.

मोहसीन हा मॉब लिचिंगचा बळी आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. निकम यांनी वकीलपत्र मागे घेतले. त्यानंतर कोणत्याही वकिलाने वकीलपत्र घेतले नाही. न्यायालयात खेटे मारुन मोहसीनच्या वडिलांना नैराश्य आले. त्यातच त्यांचे निधन झाले. मोहसीनच्या आईला ब्रेन हॅमरेज झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५० लाख रुपयांची मदत जाहीर झाली होती. प्रत्यक्षात तुटपुंजी मदत मिळाली आहे. मोहसीनच्या खुनाला मंगळवार, २ जून रोजी सहा वर्षे पूर्ण झाली.

लंडन, अमेरिकेतून झाले टिष्ट्वट- फेसबुक आणि टिष्ट्वटर जस्टीस फॉर मोहसीन हा ट्रेंड चालवण्यात आला. लंडन, अमेरिकेसह आपल्या देशातील विविध शहरांतून लोकांनी हा ट्रेंड चालवला. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, राजकीय नेत्यांचा समावेश होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक लोकांनी टिष्ट्वट केले होते. महाआघाडी सरकारने मोहसीन आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, असे अ‍ॅड. कोथिंबीरे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरTwitterट्विटरFacebookफेसबुकCourtन्यायालय