शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

सोलापूर शहरातील ८ व्यापाºयांची फसवणूक, १९ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 10:26 IST

सोलापूर : शहरात बिल्डिंग मटेरियल पुरवठा करण्याचा व्यवसाय करतो, तुमचा माल पसंद पडला आहे, गोडावूनला माल पाठवून द्या, पैसे ...

ठळक मुद्देशहरातील आठ व्यापाºयांना १९ लाख १0 हजार ४३३ रूपयांना फसविलेदोघांविरूद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर : शहरात बिल्डिंग मटेरियल पुरवठा करण्याचा व्यवसाय करतो, तुमचा माल पसंद पडला आहे, गोडावूनला माल पाठवून द्या, पैसे आरटीजीएस करतो, असे सांगून शहरातील आठ व्यापाºयांना १९ लाख १0 हजार ४३३ रूपयांना फसविल्याप्रकरणी दोघांविरूद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रमेश जैन (संपूर्ण नाव, पत्ता नाही), केतन सूर्यकांत बनसोेडे (रा. १२२, ओम नम शिवायनगर, हत्तुरे वस्ती, होटगी रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अभिषेक श्रीनिवास सोनी (वय-२५, रा. ८५, भवानी पेठ, घोंगडे वस्ती) यांचे क्युक फॅब मेटल्स प्रा. लि. नावाची कंपनी असून, त्यांचे बंधू जयकिशन सोनी यांना २२ आॅक्टोबर २0१८ रोजी फोन आला. फोनवरील व्यक्तीने मी रमेश जैन बोलतो, असे सांगून शहरात बिल्डिंग मटेरियल पुरवठा करण्याचा व्यवसाय करतो, आपणाकडे नवीन पत्रे योग्य भावात मिळतात, अशी माहिती मिळाली़ पत्र्याचे सॅम्पल दाखवता का.? असे विचारले.

जयकिसन सोनी यांनी ३१ आॅक्टोबर २0१८ रोजी रमेश जैन यांना संपर्क साधून हरे कृष्ण विहार रोड जुळे सोलापूर येथील बाफना इंटरप्रायजेस येथे जाऊन पत्र्याचे सॅम्पल दाखविले. थोड्याच वेळात जयकिसन सोनी यांना फोनवरून रमेश जैन याने सिमेंटच्या पत्र्याची आॅर्डर दिली. ८ नोव्हेंबर २0१८ रोजी रमेश जैन याला ३ लाख २८ हजार ५0 रूपये किमतीचे पत्रे पाठवण्यात आले. रमेश जैन याने अ‍ॅक्सिस बँक, शाखा विजापूर रोडचे दोन धनादेश दिले. दोन्ही धनादेश २२ व २३ नोव्हेंबर २0१८ चे होते. १३ नोव्हेंबर २0१८ रोजी पुन्हा जयकिसन सोनी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप करून पत्र्याची आॅर्डर दिली व रक्कम आरटीजीएसने पाठवून देतो, असे सांगितले. जयकिसन सोनी यांनी २ लाख ४ हजार १२0 रूपये किमतीचे पत्रे पाठवून दिले. 

रमेश जैन याला जयकिसन सोनी यांनी १६ नोव्हेंबर रोजी बिलासाठी फोन केला असता ७७९६४0३४0५ व ८६0५0३0७२८ हे दोन्ही मोबाईल बंद असल्याचे समजले. २0 नोव्हेंबर रोजी जयकिसन सोनी यांनी रमेश जैन याच्या आॅफिस व गोडावूनला भेट दिली असता दोन्ही बंद असल्याचे निदर्शनास आले. जयकिसन सोनी यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्याने शहरातील अन्य आठ व्यापाºयांकडून अशाच पद्धतीने वेगवेगळा माल घेऊन पैसे दिले नसल्याचे लक्षात आले. 

फसलेले आठ जणच्रमेश जैन याने मोईन म. रफिक शेख यांच्याकडून ८९ हजार ४२0 रूपये किमतीचे पीव्हीसी कारपेट, उमर एजाज दलाल यांच्याकडून ९३ हजार ८३४ रूपये किमतीचे प्लायवूड व सन्माईक, केतन महिंद्र शहा यांच्याकडून १ लाख २३ हजार ९९0 रूपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सुरेश चंद्रशेखर स्वामी यांच्याकडून १ लाख ७७ हजार ५४९ रूपये किमतीचे नळ साहित्य, नवराम चौधरी यांच्याकडून २ लाख ४४ हजार रूपये किमतीचे लाईट हाऊसचे सामान, अरूण बाहुबली गांधी यांच्याकडून ३ लाख २९ हजार ८00 रूपये किमतीचे फर्निचर, रमेशभाई चौधरी यांच्याकडून ८२ हजारांचे किचन ट्रॉली सामान आणि वैभव वल्लभ प्रभू यांच्याकडून २ लाख ३७ हजार ६७0 रूपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन पैसे न देता फसवणूक केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसbusinessव्यवसायfraudधोकेबाजी