१३ गावांतील ७४३ जणांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:05+5:302021-05-24T04:21:05+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते मेच्या सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत होती. ग्रामीण भागाची दिवसेंदिवस चिंताजनक ...

१३ गावांतील ७४३ जणांनी केली कोरोनावर मात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते मेच्या सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत होती. ग्रामीण भागाची दिवसेंदिवस चिंताजनक परिस्थिती झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून आरोग्य विभाग, कोरोना ग्रामसमिती व ग्रामपंचायतीने कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांवर लक्ष ठेवून त्यांची वेळेत तपासण्यांच्या प्रमाणात वाढ केल्यामुळे नागरिकांनी कडक निर्बंधाला प्रतिसाद दिल्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे.
बरे झालेल्यांची गावनिहाय संख्या
तुंगत १२१, सुस्ते १३१, मगरवाडी ७९, तारापूर १३९, खरसोळी १०५, बीटरगाव २०, नारायण चिंचोली २०, ईश्वरवठार ३८, अजनसोंड ३८, देगाव १२४, फुलचिंचोली २८, विटे २६, पोहोरगाव ३३.
गावनिहाय मयतांची संख्या
तुंगत ३, सुस्ते ८, मगरवाडी २, तारापूर १, खरसोळी ५, बीटरगाव ०, नारायण चिंचोली ६, ईश्वरवठार २, अजनसोंड ४, देगाव ९, फुलचिंचोली २, विटे ४, पोहोरगाव ५.
कोरोनाबाधितांची संख्या
तुंगत १३४, सुस्ते १५९, मगरवाडी ८१, तारापूर १६०, खरसोळी १३५, बीटरगाव २०, नारायण चिंचोली २६, ईश्वरवठार ४५, अजनसोंड ४५, देगाव १६९, फुलचिंचोली ५२, विटे ३५, पोहोरगाव ४०.
कोट ::::::::::::::::::
तुंगतचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत नवत्रे, रणजीत रेपाळ व कर्मचाऱ्यांच्या वारंवार बैठका घेऊन सूचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी जीव धोक्यात घालून काम केल्यामुळे तसेच कोरोनाच्या तपासण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचे प्रमाण घटत आहे.
- प्रा. सुभाष माने,
जिल्हा परिषद सदस्य