शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Experimental school; शिक्षणातून व्यवहार ज्ञान देणारी भागाईवाडीची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 10:21 IST

शाळेचं मोठं कर्तृत्व : आयएसओ मानांकनप्राप्त तालुक्यात दुसरी शाळा; बोलक्या भिंतीनं केली मुलं बोलकी

ठळक मुद्दे शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर. देवापुढं जसं नतमस्तक होतो तसंच हे पवित्र मंदिरकाळ्या आईचा वारसा सांगणाºया बळीराजाच्या या चिमुकल्यांनी इथल्या ज्ञानमंदिरात आनंददायी शिक्षणातून व्यवहार ज्ञानाचं कसब साधलंय डिजिटल युगात संगणकावर हळुवार बोटे फिरवत माहिती तंत्रज्ञानालाही अवगत केलं आहे.

सोलापूर : शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर. देवापुढं जसं नतमस्तक होतो तसंच हे पवित्र मंदिर. ही उपमा लागू पडते भागाईवाडीच्या (ता. उत्तर सोलापूर) झेडपी शाळेला. काळ्या आईचा वारसा सांगणाºया बळीराजाच्या या चिमुकल्यांनी इथल्या ज्ञानमंदिरात आनंददायी शिक्षणातून व्यवहार ज्ञानाचं कसब साधलंय. डिजिटल युगात संगणकावर हळुवार बोटे फिरवत माहिती तंत्रज्ञानालाही अवगत केलं आहे.

८०० लोकवस्ती असलेल्या छोट्या गावच्या शाळेनं खूप मोठं व्हावं या जाणिवेतून मुख्याध्यापक अन् शिक्षकांनी शहरातल्या शाळांच्याही पुढं जाऊन शाळा बदलण्याचा ध्यास घेतला. म्हणूनच की काय ही शाळा जागतिक गुणवत्ता मानांकनप्राप्त ठरलीय. उत्तर सोलापूर तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलाय. दोन शिक्षकी या शाळेत बहुवर्ग अध्यापक प्रणाली राबवून शिकवलं जातं. मुलांना शिकवलेलं स्मरणात राहावं यासाठी शाळेचं बाह्य व अंतरंग रंगरंगोटी, बोलक्या भिंतीचा वापर केलाय. याशिवाय प्रशस्त ग्राऊंड ,वृक्षलावड, ई -लर्निंग, संगणक, आर. ओ. प्लान्ट या भौतिक सुविधांमुळे मुलांनी शालेय शिक्षण अन् अद्ययावत माहितीचे धडेही     त्यांना मिळत आहेत. मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं यासाठी आनंद बाजारसारखा उपक्रमही मुलांना भावला आहे. परिसर अभ्यासातून बाह्यजगाची ओळख होऊ लागली आहे. या सर्व उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. शाळेतील अनेक भौतिक सुविधा लोकवर्गणीतून साकारल्या आहेत. मुलांनी शिष्यवृत्तीपासून क्रीडा स्पर्धांमधूनही आपली चमक दाखवली आहे.

अभिनव उपक्रमांवर भरमुलांना मनोरंजनातून अध्यापनाचे धडे मिळावे याकडे शाळेने लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. इथल्या इ. १ ते ५ वीच्या वर्गखोल्यांना परिसरातील नद्यांची नावे दिली आहेत. यात नागझरी (१ ली), भोगावती (२ री), सीना (३ री), चंद्रभागा (४ थी), कृष्णा (५ वी) यांचा समावेश आहे. आनंद बाजारसारख्या उपक्रमातून गणित विषयाची गोडी, परिसर भेटमधून आजूबाजूच्या बाह्य जगाची ओळख देण्यावर मुख्याध्यापक आदिल सय्यद आणि शीला पाटील या गुरुजनांनी आपले प्रयत्न चालवले आहेत.

प्राथमिक शिक्षण हा मूलभूत पाया. म्हणूनच ग्रामपंचायतीने तरतुदीपेक्षा खर्च करुन सोयी उपलब्ध करुन दिल्या  आहेत. लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होईल.-सविता घोडके-पाटील, सरपंच 

मुलांना आनंददायी शिक्षण मिळावं यासाठी शाळेच्या भिंतीवर अभ्यासाची माहिती उपलब्ध केली. यामुळं मुलं आपसुक ज्ञान ग्रहण करताहेत. त्यांना अभ्यास आणि बाह्य जगाची ओळख निर्माण करण्यावर भर दिला जातोय.  -आदिल सय्यद, मुख्याध्यापक

हाकेला धावणारे पालकविद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पालक आणि ग्रामस्थांचे योगदान मोलाचे आहे. इथे राबवलेल्या विविध उपक्रमांमध्ये लोकवर्गणीच्या रुपानं नेहमीच पाठबळ मिळालेलं आहे. शिक्षणानंच भावी पिढी घडते यावर यांचा नितांत विश्वास आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षणSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद