भवानी पेठेत ६८ किलो स्पेशल बर्फी जप्त; दुकानात अस्वच्छता असल्याने कारवाई

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: October 14, 2023 16:24 IST2023-10-14T16:24:01+5:302023-10-14T16:24:16+5:30

अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुनील जिंतूरकर यांनी दिली.

68 kg special barfi seized in Bhawani Peth Action taken due to unsanitary conditions in the shop | भवानी पेठेत ६८ किलो स्पेशल बर्फी जप्त; दुकानात अस्वच्छता असल्याने कारवाई

भवानी पेठेत ६८ किलो स्पेशल बर्फी जप्त; दुकानात अस्वच्छता असल्याने कारवाई

सोलापूर : अन्न प्रशासनाने भवानी पेठेतील एका दुकानावर धाड टाकून स्पेशल बर्फी जप्त केली आहे. दुकानात अस्वच्छता असून अस्वच्छतेच्या ठिकाणी स्पेशल बर्फीची साठवणूक केल्याप्रकरणी अन्न प्रशासनाने ६८ किलो स्पेशल बर्फी तत्काळ जप्त करुन नष्ट केला आहे. याची साधारण किंमत १७ हजार रुपये आहे, अशी माहिती अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली आहे.

उत्तम जूताराम चौधरी (रा. भवानी पेठ, सोलापूर) यांच्या दुकानावर कारवाई झाली आहे. अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती पाटील यांनी ही कारवाई केली आहे. जप्त केलेली बर्फी नष्ट केले. बर्फीचे नमुने पुणे प्रयोगशाळेकडे पाठवले. नमुन्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुनील जिंतूरकर यांनी दिली.

Web Title: 68 kg special barfi seized in Bhawani Peth Action taken due to unsanitary conditions in the shop