शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सोलापूरात पाच महिन्यांत पकडली ६२३ मोकाट जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:21 IST

मालकांचा शोध लागेना : वैरणीवर झाला सव्वा लाख खर्च

ठळक मुद्देपाच महिन्यात शहरातील भटक्या जनावरांविरुद्ध मोहीम उघडली वैरणीवर १ लाख २७ हजारांचा खर्च झाला पकडण्यात आलेल्या जनावरांच्या मालकांचा शोध लागेना

सोलापूर : महापालिकेने गेल्या पाच महिन्यात शहरातील भटक्या जनावरांविरुद्ध मोहीम उघडली आहे. ६२३ जनावरे पकडण्यात आली, त्यासाठी वैरणीवर १ लाख २७ हजारांचा खर्च झाला आहे. पकडण्यात आलेल्या जनावरांच्या मालकांचा शोध लागत नसल्यामुळे पालिका प्रशासन वैतागलेले आहे.

शहरातील भटक्या जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. महापालिकेने लावलेली झाडे खाल्ली जातात. कचरा कुंडीत फेकण्यात आलेल्या अन्नावर ही जनावरे व कुत्री जगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी भटकी जनावरे पकडण्याची मोहीम घेण्याचे मंडई विभागाला आदेश दिले. जनावरे पकडण्यासाठी खास पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने एप्रिलमध्ये: ६0, मार्च:९२, जून: २0४, जुलै: १४४, आॅगस्ट: १२३ अशी ६२३ जनावरे पकडली. जे मालक जनावरे सोडवून नेण्यासाठी आले त्यांच्याकडून ४ लाख २४ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी २१ गायी गोपालक संघाकडे जमा करण्यात आल्या आहेत. 

शहरात अनेकजण गायी मोकाट सोडून देतात. दिवसभर या गायी फिरून कचºयातील चारा शोधत फिरतात. यामुळे कचरा विखुरला जातो तर प्लास्टिक पिशवीतील अन्न खाण्याच्या नादात अनेक गायी या पिशव्याही गिळंकृत करतात. चरणे झाल्यावर ही जनावरे कळपाने चौकात बसकन मारतात. 

भटकी जनावरे पकडण्यासाठी मंडई विभागाकडे खास व्हॅन आहे. पण इंधन नसल्याने व मेन्टनससाठी ही व्हॅन अनेकवेळा बंद राहते. कोंडवाड्यातही जनावरांना मोकळे वातावरण ठेवण्याची गरज आहे. ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे अधीक्षक अखलाक चांदा यांनी सांगितले. 

मोकाट जनावरांमुळे अपघात- मोठ्या प्रमाणावर गाढव मोकाटपणे फिरताना आढळतात. यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. भटक्या जनावरांची संख्या कमी व्हावी म्हणून दंड तीनपटीने वाढविण्यात आला आहे. याचा फटका काही मालकांना बसला आहे. पण तरीही अनेकजण पकडून नेलेल्या गायी कोंडवाड्यात दंड भरून आणतात व परत रस्त्यावर सोडून देत असल्याचे दिसून आले आहे. 

कोंडवाड्यात ठेवण्यात येणाºया जनावरांच्या दंडात वाढ केली आहे. त्यामुळे या जनावरांची निगा राखली पाहिजे. सर्वच जनावरांना पुरेसा चारा देणे आवश्यक आहे. जनावरांची काळजी घेतली जाते की, नाही हे पशुवैद्यकीय अधिकाºयांनी वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. - संजय कोळी, सभागृहनेते , सोलापूर महानगर पालिका

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका