सोलापूर जिल्ह्यातील ५३६ कोतवाल संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:12 IST2018-12-26T12:52:03+5:302018-12-26T13:12:14+5:30
सोलापूर : सलग दुसºया दिवशी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ५३६ कोतवाल संपावर गेले आहेत. दरम्यान, मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोतवाल संघटनेने ...

सोलापूर जिल्ह्यातील ५३६ कोतवाल संपावर
सोलापूर : सलग दुसºया दिवशी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ५३६ कोतवाल संपावर गेले आहेत. दरम्यान, मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोतवाल संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुसºया दिवशीही धरणे आंदोलन केले.
कोतवालांना शिपायापर्यंत पदोन्नती मिळावी, कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचा दर्जा द्यावा आदी मागण्यांसाठी कोतवालांनी संप पुकारला आहे. कोतवाल हे महसूल खात्यातील शेवटचे पद आहे. या पदावरील कर्मचारी चोवीस तास राबतो; मात्र त्याला शासकीय सुविधा मिळत नाहीत. तोकड्या मानधनावर त्यांना काम करावे लागत आहे.
कोतवालांच्या मागण्यांसाठी यापूर्वी आंदोलने झाली. याची दखल घेत महसूल प्रशासनाने त्यांच्या श्रेणीचा प्रस्ताव तयार केला पण तो मार्गी लागला नाही. त्यामुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या निर्णयावरून कोतवालांनी सलग दुसºया दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारून घोषणाबाजी करून लक्ष वेधले.