शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षे पूर्ण नसताना गाडी चालविलेल्या १४ जणांना प्रत्येकी ५ हजाराचा दंड

By appasaheb.patil | Updated: December 8, 2022 15:36 IST

वाहतूक पोलिसांची कारवाई; सोलापूर ग्रामीण पोलिसांचे पथके तैनात

आप्पासाहेब पाटील

साेलापूर : १६ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना वाहन चालविताना वाहतूक शाखेच्या पथकाने पकडल्यास तब्बल पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो. अल्पवयीनने गुन्हा केल्यास वाहनाच्या मालकाला दोषी ठरवले जाईल. शिवाय दंडही केला जाईल. एवढेच नव्हे, तर तुरुंवासही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच गाडीची नोंदणी एक वर्षासाठी रद्द केली जाईल, असेही वाहतूक शाखेच्या आधिकाऱ्याने सांगितले. मागील दहा महिन्यांत सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने जिल्ह्यात अशा प्रकारच्या १४ कारवाया केल्या आहेत. प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे ७० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

दरम्यान, मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारणांमुळे नियम कडक व दंडाची रक्कम वाढविण्यात आली असली तरी त्यासोबत वाहन चालकांसाठी या कायद्यात काही समाधानकारक तरतुदीही करण्यात आल्या आहेत. वाहन परवान्यासाठी अर्ज आणि वाहन नोंदणी आता राज्यातील कुठल्याही आरटीओमध्ये करता येईल, तसेच वाहन परवान्याचे नूतनीकरण करायचे असल्यास वर्षभरात कधीही करू शकता. याआधी एक महिन्याच्या आतच वाहन परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक होते.

दरम्यान, महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले स्टायलिश राहण्यास पसंत करतात. एखाद्या चित्रपटामधील हीरोसारखे राहणेही पसंत करतात. त्या हीरोची स्टाइल, गाडी चालविणे, कपडे यासह अन्य गोष्टींची कॉफी करताना अनेक तरुण आढळतात. त्याप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसताना अनेक मुले महाविद्यालय परिसरात गाड्या चालवितानाचे चित्र नेहमीच दिसून येते. वाहतूक नियमांचे उल्लंघन होईल, असे कृत्य कोणत्याही वाहनधारकाने करू नये. वाहन चालविण्याचा परवाना नसताना कोणत्याही पालकाने आपल्या मुलास वाहन चालविण्यास देणे चुकीचे आहे. चुकून अपघात झाल्यास पश्चात्तापाची वेळ येते. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.

- महेश स्वामी, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSolapurसोलापूर